फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताच्या संघाने कळसाचा सामना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली जिंकून मालिकेमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. उद्या म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी मालिकेतील शेवटचा सामना रंगणार आहे हा सामना जिंकताच भारतीय संघ मालिका जिंकेल. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात कमालीचं विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर मालिकेटमध्ये १-१ अशी बरोबरी झाली होती. काल तिसरा सामना झाला यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवून २-१ अशी आघाडी आहे.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला 4 सामन्यांची मालिका आहे शेवटच्या सामन्यांमध्ये जर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवल्यास मालिकेत 2-2 अशी बरोबरी होईल. चौथा T20 सामना 15 नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल करू शकतो. आत्तापर्यंत खेळलेल्या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये अपयशी ठरलेली फिनिशर रिंकू सिंगचे प्लेइंग ११ मधून नाव कमी होऊ शकते.
हेदेखील वाचा – Border Gavaskar Trophy 2024 : ते अजूनही घाबरलेले आणि बुजलेले; अखेर रिकी पॅाटींगचे गौतम गंभीरला जोरदार प्रत्त्युत्तर
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा पुन्हा एकदा डावाची सुरुवात करू शकतात. संजूने पहिल्या T20 मध्ये शतक झळकावले होते, मात्र त्यानंतर पुढच्या 2 सामन्यात तो आपले खाते उघडू शकला नाही. दुसरीकडे, अभिषेक शर्मा पहिल्या 2 T20 मध्ये अपयशी ठरला. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. शेवटच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टिळक वर्माने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. अशा स्थितीत शेवटच्या T20 मध्येही त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवले जाऊ शकते.
जर टिळक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी आला तर कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. अष्टपैलू हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. रिंकू सिंग बाद झाल्यास जितेश शर्माला सहाव्या क्रमांकावर आजमावले जाऊ शकते. गेल्या सामन्यात पदार्पण करणारा रमणदीप सिंग पुन्हा एकदा 10 व्या क्रमांकावर दिसू शकतो. रमणदीप वेगवान गोलंदाजीतही सक्षम आहे. जलद गोलंदाजीचे नेतृत्व अर्शदीप सिंग करणार आहे. हार्दिक पांड्याही त्याला साथ देईल. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्या खांद्यावर असेल.
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विष्णोई, अविनाश खान, विजयकुमार खान. , यश दयाल.