रोहित शर्माच्या फलंदाजीपुढे आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाजही निष्प्रभ! (Photo Credit- X)
रोहित-कोहलीची महत्त्वपूर्ण भागीदारी
टीम इंडियाच्या डावात यशस्वी जैस्वाल १८ धावांवर लवकर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा फलंदाजीला आला. रोहितने ५१ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची प्रभावी खेळी केली. दुसऱ्या विकेटसाठी रोहित आणि कोहलीने १३६ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली, ज्यामुळे भारताच्या मोठ्या धावसंख्येची पायाभरणी झाली.
रोहितबद्दल डेल स्टेन काय म्हणाला?
डेल स्टेनने रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक करताना अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. “रोहितने डावाच्या सुरुवातीला एक संधी दिली होती, पण कॅच सुटल्यानंतर त्याने त्याचा पूर्ण फायदा घेतला.” “त्याला कव्हर ड्राईव्ह (Cover Drive) आणि फ्लिक (Flick) खेळायला खूप आवडते. तो जेव्हा हवा असेल, तेव्हा विकेटच्या पुढे येऊन मोठा शॉट मारून गोलंदाजावर दबाव टाकतो.” “त्याच्या खेळीतील सर्वात खास शॉट तो होता, जेव्हा त्याने शॉर्ट थर्ड मॅनच्या (Short Third Man) डोक्यावरून चेंडू चार धावांकरिता गाईड केला. तो खरंच कमालचा शॉट होता.” “तो एक शानदार फलंदाज आहे आणि मला त्याला खेळताना पाहायला खूप आवडते, जरी मी त्याला कधीही बाद करू शकलो नाही.”
रोहितला आऊट न करू शकण्याचे कारण
डेल स्टेनने १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो रोहित शर्माला एकदाही बाद करू शकला नाही. रोहितने स्टेनच्या ११७ चेंडूंचा सामना केला आणि ७४ धावा केल्या. रोहितने स्टेनच्या ४ चेंडूंवर ७ धावा केल्या. केवळ कसोटी क्रिकेटमध्ये स्टेनने रोहितला ४१ चेंडू टाकून १७ धावांच्या बदल्यात १ वेळा बाद केले आहे.
कोहली-रोहितचे पुढील लक्ष्य
सध्या ३७ वर्षांचा विराट कोहली आणि ३८ वर्षांचा रोहित शर्मा या दोन्ही दिग्गजांचे एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे २०२७ चा वनडे वर्ल्ड कप खेळणे आणि भारताला ट्रॉफी जिंकवून देणे. कोहलीने २०११ चा वर्ल्ड कप जिंकण्याचा अनुभव घेतला आहे, तर रोहित शर्माला अजूनही वनडे वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलता आलेली नाही. रोहित आणि कोहली दोघेही वर्ल्ड कप जिंकून आपल्या कारकिर्दीचा शेवट करण्याचा विचार करत आहेत.






