फोटो सौजन्य - All Cricket Records सोशल मीडिया
आयसीसी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्का : २०२४ मध्ये भारताच्या संघाने T२० विश्वचषक जिंकला पण २०२४ हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी चांगले गेले नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तथापि, २०२५ वर्षाची सुरुवात भारतीय संघासाठी चांगली झाली. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आणि मालिका ४-१ अशी जिंकली. यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली यामध्ये अभिषेक शर्मा, वरून चक्रवर्ती या खेळाडूचा समावेश आहे.
आता, जेव्हा आयसीसीने जानेवारी २०२५ साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली तेव्हा कोणत्याही भारतीय खेळाडूला या पुरस्कारात स्थान मिळू शकले नाही. वेस्ट इंडिजच्या फिरकी गोलंदाजाने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकला आहे. यासंदर्भात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी त्याच्या X अकाउंटवर घोषणा केली आहे.
वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकनने आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा किताब जिंकला आहे. जानेवारीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने शानदार कामगिरी केली होती. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाज नोमान अली आणि वरुण चक्रवर्ती यांना हरवून आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा किताब जिंकला आहे. मे २०२४ नंतर, वेस्ट इंडिजच्या कोणत्याही खेळाडूला महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळालेला नाही. त्याच वेळी, वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत १४ विकेट्स घेत आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ किताबासाठीचा आपला दावा मजबूत केला.
Well done to Australia batter Beth Mooney and West Indian spinner Jomel Warrican for winning the ICC Player of the Month Awards for January. Beth was pivotal in her team’s Ashes win and Jomel took 19 wickets in two Test matches at an average of just 9.00. pic.twitter.com/pKnukBvcto
— Jay Shah (@JayShah) February 11, 2025
जोमेल वॉरिकनने पाकिस्तानी भूमीवर आपल्या फिरकी गोलंदाजीने पाकिस्तानी खेळाडूंना मागे टाकले. त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या २ सामन्यात ७१.५ षटके टाकली. या काळात, फिरकी गोलंदाजाने १४ मेडन षटके टाकली. याशिवाय या खेळाडूने १९ विकेट्सही आपल्या नावावर केल्या. यामुळे, जोमेल वॉरिकनला आयसीसीने एक मोठे पदक बहाल केले.
वेस्ट इंडिजने ३५ वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी सामना जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या एका डावात जोमेल वॉरिकनने ५ विकेट्स घेतल्या आणि या सामन्यात एकूण ९ विकेट्स घेतल्या. याच कारणामुळे वेस्ट इंडिजने ३५ वर्षांनंतर पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेट सामना जिंकला.