आयसीसी महिला विश्वचषक 2026 (फोटो- ai gemini)
12 जूनपासून सुरू होणार आयसीसी महिला विश्वचषक
नंदिनी शर्मा या खेळाडूवर असणार सर्वांची नजर
14 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान येणार आमनेसामने
ICC Women’s T20 World Cup 2026: लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. 12 जूनपासून आयसीसी महिला वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये 5 युवा खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असणार आहे. यामध्ये एका भारतीय खेळाडूचा देखील समावेश आहे.
जॉर्जिया वोल: आयसीसी महिला वर्ल्ड कप 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वोल या खेळाडूकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. जॉर्जियाने अत्यंत कमी कालावधीत क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 22 वर्षीय या खेळाडूच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. जॉर्जिया वोल इतच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखली जाते.
नंदिनी शर्मा: नंदिनी शर्मा भारतीय संघाची वेगवान गोलंदाज आहे. नंदिनी शर्माने महिला प्रीमियर लीगमध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे. तिने 10 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या. तिने भारतीय संघाकडून डेब्यू केले, तेव्हा तिने 34 रन्समध्ये 3 विकेट्स घेतल्या. अचूक आणि भेदक गोलंदाजी तिची ओळख असणार आहे.
Harmanpreet Kaur: ‘मी रिटायर व्हावं असं…’; हरमनप्रीत कौरची पत्रकाराला गुगली, Video Viral
कायला रेनेके: कायला रेनेके ही दक्षिण आफ्रिकेची महत्वाची खेळाडू आहे. ती या वर्ल्ड कप स्पर्धेत शानदार कामगिरी करण्याची शक्यता आहे. 20 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 9 टी 20 सामन्यांमध्ये 5 विकेट देखील घेतल्या आहेत.
फेबे मोल्केनबोएर: महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. यातच आता नेदरलँड्सच्या संघात एका अशा अष्टपैलू खेळाडूची चर्चा रंगली आहे, ही खेळाडू म्हणजेच 21 वर्षीय फेबे मोल्केनबोएर. फेबेने अत्यंत कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याची छाप पाडली असून आगामी सामन्यांमध्ये ती नेदरलँड्ससाठी सर्वात मोठी मॅच-विनर ठरू शकते.
Team India सेमीफायनलमध्ये जाणार? Women’s T20 World Cup बाबत नासिर हूसैन यांचे मोठे भाष्य
12 जूनपासून आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. 14 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच सराव सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताचे पारडे जड असणार आहे.






