Manav Suthar: पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स, मानव सुथारने इतिहास रचत दिग्गजांना टाकले मागे
इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी सर्व संघांच्या कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जेव्हा ३७ वर्षीय हरमनप्रीत कौरला एका पत्रकाराने विचारले की, ‘हा तुझा शेवटचा विश्वचषक आहे का?’ या प्रश्नावर हरमनप्रीतने तत्काळ प्रत्युत्तर देत म्हटले, ‘हा माझा शेवटचा विश्वचषक का आहे? मी निवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटतंय का?’ हरमनप्रीतच्या उत्तराने रिपोर्टर थोडा अस्वस्थ दिसला आणि म्हणाला, “नाही, मला फक्त जाणून घ्यायचे होते. हा तुमचा शेवटचा विश्वचषक नाही हे ऐकून मला आनंद झाला.” त्यावर हरमनप्रीत हसून म्हणाली, “मग तुम्ही हे का विचारत आहात?’ हरमनप्रीतच्या या बेधडक उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीचे कौतुक केले. काहींनी पत्रकारांच्या अशा प्रश्नांवरही नाराजी व्यक्त केली.
Reporter is bang on
Harmanpreet Kaur is a liability in this team
Even last odi wc she hardly played impactfull knocks pic.twitter.com/XjhraGCdxf — Keshava (@Keshav367212606) June 7, 2026
महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला १२ जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर भारताचा १७ जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध होईल. त्यानंतर संघ २१ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी सामना करेल.भारतीय संघ २५ जून रोजी बांगलादेशविरुद्ध खेळेल आणि २८ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा गट सामना खेळेल. या वर्षीच्या महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले असून, त्यांची प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
हरमनप्रीत कौरने भारताला ५० षटकांच्या विश्वचषकात विजय मिळवून दिला. ५० षटकांचा विश्वचषक २०२५ मध्ये भारतात खेळला गेला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. भारताला ५० षटकांच्या विश्वचषकात विजय मिळवून देणारी हरमनप्रीत कौर ही पहिली महिला कर्णधार आहे.






