फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India U19 vs New Zealand U19 Live Streaming : २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघ विजयी घोडदौड करत आहे. संघाने आपले पहिले दोन सामने जिंकले आणि सुपर सिक्समध्ये स्थान निश्चित केले. आता, आपल्या शेवटच्या गट सामन्यात, भारतीय संघ न्यूझीलंडच्या १९ वर्षांखालील संघाशी सामना करेल. आतापर्यत भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे आज टीम इंडियाकडे न्यूझीलंडचे मोठे आव्हान असणार आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील संघ विजयाची हॅटट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवेल.
या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा तरुण वैभव सूर्यवंशीवर असतील. दरम्यान, न्यूझीलंड (India Under 19 vs New Zealand Under 19) यांना अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यांचे मागील दोन्ही सामने पावसामुळे अनिर्णीत राहिले. तर, हा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल ते जाणून घेऊया. आणि चाहते हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कसा पाहू शकतात (IND U19 vs NZ U19 Live Streaming)?
सूर्या की ईशान… India vs New Zealand दुसऱ्या T20 सामन्यात कोणाला निवडण्यात आले सामनावीर?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज अंडर 19 चा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना शनिवार, २४ जानेवारी रोजी खेळला जाईल. हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल. या सामन्यांची सुरूवात भारतीय वेळेनुसार दुपारी १:०० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी १२:३० वाजता होईल. तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर भारतीय अंडर-१९ संघ आणि न्यूझीलंड अंडर-१९ संघ यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक सामना पाहू शकता. तुम्ही जिओ हॉटस्टार अॅप वापरून तुमच्या मोबाईल फोनवर भारतीय अंडर-१९ संघ आणि न्यूझीलंड अंडर-१९ संघ यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक सामना पाहू शकता.
Some exciting games today with three teams pushing for their first win of their #U19WorldCup campaign 🙌 Find out how to watch here 👉 https://t.co/jKX6xmmOJQ pic.twitter.com/utf6iQd0zt — ICC (@ICC) January 24, 2026
आयुष म्हात्रे (कर्णधार), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, दीपेश देवेंद्रन, मोहम्मद एनान, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन पटेल, हरवंश पांगलिया, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी.
ब्रँडन मॅटझोपोलोस, ह्यूगो बोग, जेकब कॉटर, ल्यूक हॅरिसन, टॉम जोन्स (कर्णधार), कॅलम सॅमसन, फ्लिन मोरे, हॅरी बर्न्स, जसकरण संधू, स्नेहित रेड्डी, आर्यन मान, मार्को अल्पे, हॅरी वेट, हंटर शोर, मेसन क्लार्क, सेल्विन संजय.






