फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, तर पाच सामन्यांची टी20 मालिका देखील आयोजित करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधार पद हे शुभमन गिलकडे असणार आहे. ऑस्ट्रेलियाचे संघाची कमान मिचेल मार्शकडे असणार आहे. हा मालिकेचा पहिला सामना हा 19 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे, भारताचा संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया आता पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे, भारताविरुद्ध मालिका सुरु होण्याआधी आता ऑस्ट्रेलिया संघासंदर्भात मोठी एपडेट समोर आली आहे. जरी या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला दोन मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमन मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्याचा मानस आहे, परंतु दोन स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वपूर्ण बदल होतील. ऑस्ट्रेलियन संघाने या दोन स्टार खेळाडूंच्या जागी खेळाडूंची घोषणा देखील केली आहे. या दोन्ही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
JOSH PHILIPPE AND MATT KUHNEMANN WILL JOIN THE AUS TEAM FOR THE FIRST ODI VS INDIA. PHILIPPE WILL KEEP WICKETS FOR JOSH INGLIS WHO HAS NOT FULLY RECOVERED FROM A CALF STRAIN, WHILE KUHNEMANN REPLACES ADAM ZAMPA, WHO WILL MISS THE FIRST MATCH OF THE SERIES FOR FAMILY REASONS…. https://t.co/ETmqgmlTWA — Professor (@Off_Spinnerr) October 14, 2025
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. स्टार फिरकीपटू अॅडम झांपा आणि जोश इंगलिस यांना पर्थ वनडेतून बाहेर काढण्यात आले आहे. अॅडम झांपा दुसऱ्यांदा वडील होणार आहेत, त्यामुळेच तो दुसऱ्या वनडेपासूनच ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असू शकतो. पहिल्या वनडेसाठी त्याच्या जागी मॅथ्यू कुहनेमनची निवड करण्यात आली आहे. तथापि, झांपा परतल्यानंतर कुहनेमनला सोडण्यात येईल. झांपा नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी कमकुवत होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान पायाच्या दुखापतीमुळे जोश इंगलिस पहिल्या वनडेतून बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिका कसोटीदरम्यान पाकिस्तानसाठी वाईट बातमी, 20 सामने खेळणाऱ्या फलंदाजाचे निधन
दुसऱ्या वनडेपूर्वी तो तंदुरुस्त होईल आणि पुन्हा संघात सामील होईल अशी अपेक्षा आहे. जोश इंगलिसच्या जागी जोश फिलिप संघात परतला आहे. अॅलेक्स कॅरी सध्या अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे, ज्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी फिलिपचा अंतिम अकरा जणांमध्ये समावेश होणे निश्चित दिसते. ऑस्ट्रेलियाला आधीच कर्णधार पॅट कमिन्सची कमतरता भासत आहे, जो दुखापतीमुळे खेळू शकत नाही. अॅशेसमध्ये कमिन्स पुन्हा मैदानात उतरू शकतो.