अभिषेक शर्मा आणि इरफान पठाण(फोटो-सोशल मीडिया)
Irfan Pathan’s advice to batsman Abhishek Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पांच सामन्यांची टी २० मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. या मालिकेत भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. दरम्यान, माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने तरुण फलंदाज अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीचे कौतुक करत त्याला महत्त्वपूर्ण सल्ला देखील दिला आहे.
इरफान पठाण म्हणाला की अभिषेक शर्माचा आक्रमक दृष्टिकोन हा भारतीय संघासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु त्याला कधी आणि कोणत्या गोलंदाजाविरुद्ध जोखीम घ्यावी हे मात्र शिकण्याची आवश्यकता आहे. पठाणच्या मते, जर अभिषेक शर्माने रणनीतीशिवाय प्रत्येक चेंडूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर विरोधी संघ लवकरच त्याचा खेळ समजून घेतील आणि त्याला बाद कसे करायचे याचा मार्ग शोधतील.
इरफान पठाण पुढे म्हणाला की, “अभिषेक निर्भय क्रिकेट खेळतो, ही बाब खूप चांगली आहे. परंतु जर तो प्रत्येक गोलंदाजावर त्याच प्रकारे हल्ला करतो तर ते त्याच्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. त्याला कोणत्या षटकात आणि कोणत्या चेंडूवर हल्ला करायचा हे शिकण्याची आवश्यकता असून आक्रमकता महत्त्वाची आहे, परंतु त्यामागील रणनीती देखील तितकीच महत्त्वाची आहे.”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेत अभिषेक शर्माने त्याच्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याला मालिकावीर म्हणून देखील निवडण्यात आले. अभिषेकने मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आणि सलामीवीर शुभमन गिलसह अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाला चांगली सुरुवात देखील करून दिली.
इरफान पठाणने असे देखील कबूल केले की, अभिषेक शर्माच्या खेळात काही तांत्रिक सुधारणा करण्याची आवश्यक आहेत, तेही विशेषतः वेगवान गोलंदाजांविरुद्ध. तो म्हणाला की, “जेव्हा तुम्ही ५०० पेक्षा जास्त चेंडूंमध्ये १००० धावा करता तेव्हा तुमच्यावरील दबाव वाढतो, अपेक्षा वाढतात. आता, विरोधी संघ त्यांच्यासाठी रणनीती आखण्यासाठी त्याचे व्हिडिओ पाहतील. म्हणून, त्यांना त्यांचा खेळ समायोजित करावा लागेल आणि अनावश्यक जोखीम टाळण्याचे शिकावे लागणार आहे.”
हेही वाचा : हरमनप्रीत कौर ‘लेस्बियन’ असण्याचा दावा! सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टने उडवली खळबळ; नेमकं प्रकरण काय?
इरफान पठाणने शेवटी असे देखील म्हटले की “अभिषेक शर्माला परिस्थितीनुसार गीअर्स बदलता यायला हवे. म्हणजेच त्याच्या खेळाच्या गतीवर नियंत्रण ठेवता यायला पाहिजे. जर अभिषेकने या दिशेने काम करत राहिला तर तो भविष्यात भारताच्या सर्वात यशस्वी टी-२० फलंदाजांपैकी एक बनण्याची शक्यता आहे.”






