रियान पराग आणि ऋतुराज गायकवाड(फोटो-सोशल मीडिया)
RR vs CSK : आयपीएल 2025 मध्ये आज दि. 30 मार्च रोजी क्रिकेटप्रेमींसाठी डबल धामका अनुभवायला मिळणार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार असून दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटी येथे रंगणार आहे. आज आम्ही तुम्हाला चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील सामन्याशी संबंधित अपडेट देणार आहोत.
चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्स विरुद्धचा पहिला सामना जिंकून आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाची जोरदार सुरवात केली होती. परंतु चेन्नई त्यांचा दूसरा सामना आरसीबीवृद्ध गमावून बसली. तर दुसरीकडे राजस्थानला पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध तर दुसऱ्या सामन्यात कोलकाताविरुद्ध लागोपाठ पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत आता दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
हेही वाचा : MI vs GT : GT कडून पराभव, पण Rohit Sharma ने रचला मोठा विक्रम; आयपीएल इतिहासातील ठरला 3 रा भारतीय
आयपीएल 2025 चा 11 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाणार आहे. मात्र, नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे.
गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथे फलंदाजीसाठी हे मैदान चांगले दिसून येत आहे. ज्यामध्ये आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये किमान 9 धावा प्रति षटकामागे धावा होताना दिसून आल्या आहे. तसेच मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीची थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास पसंती देऊ शकतो. जेणेकरून लक्ष्याचा पाठलाग करणे सहज होईल.
हवामानाबद्दल सांगायचे झाले तर दिवसभर आकाश ढगाळ राहणार आहे. परंतु पावसाची कोणतीही शक्यता नाही. अशा वेळी चाहत्यांना धावांचा पाऊस बघायला मिळण्याची शक्यता आहे. दिवसभरात येथील तापमान जास्त राहाणार आहे. संध्याकाळी सामना सुरू होईल तेव्हा तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असणार आहे. संध्याकाळ जसजशी वाढत जाईल तसतशी आर्द्रता देखील वाढत जाणार आहे.
हेही वाचा : GT vs MI : शुभमन गिलच्या नावे अनोखा विक्रम : एकाही भारतीयाला जमलं नाही, ते जीटीच्या कर्णधाराने करून दाखवलं…
आयपीएल इतिहासात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 29 सामने खेळण्यात आले आहेत. ज्यामध्ये सीएसकेने 16 सामन्यावर आपले नाव कोरले आहे, तर राजस्थान संघाने 13 सामने जिंकले आहेत. आपण धावसंख्येबद्दल बोलायचे झाल्यास तर, आरआर विरुद्ध सीएसकेची सर्वोत्तम 246 धावसंख्या राहिली आहे. तर आरआरची सीएसके विरुद्ध सर्वोत्तम धावसंख्या 223 धावा राहिल्या आहेत. तसेच मागील आयपीएल 2024 मध्ये चेन्नई आणि राजस्थान यांच्यात फक्त एकच सामना झाला होता, ज्यामध्ये चेन्नई संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला होता.
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना.
चेन्नई सुपर किंग्ज –राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रवींद्र जडेजा, दीपक हुडा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, सॅम कुरन, नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथीराना.