फोटो सौजन्य - बीसीसीआय
आशिया कप 2025 मधील सुपर चारचा चौथा सामना हा भारत विरुद्ध बांगलादेश या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या दोन्ही देशांनी अशिया कप सुपर चार मधील त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. चौथा सामना या दोन देशांमध्ये खेळवल्या जाणार आहे जो हा सामना जिंकेल तो संघ फायनलच्या शर्यतीत जवळजवळ स्थान पक्के करणार आहे. बांगलादेशच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाला पराभूत करून पहिला विजय नोंदवला होता तर भारताच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला पराभूत करून पहिला विजय नावावर केला आहे.
भारताच्या संघाने पाकिस्तानला या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा पराभूत केले. आतापर्यंत भारताचा संघाने या स्पर्धेमध्ये एकही सामना जिंकलेला नाही त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश संघाला विजय मिळवणे नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. बांगलादेशच्या संघाला साखळी सामन्यांमध्ये श्रीलंके विरुद्ध एक पराभवाचा सामना करावा लागला होता पण सुपर चारच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशच्या संघाने श्रीलंकेला पराभूत करून पहिला सुपर चारचा विजय नोंदवला होता.
भारताच्या गोलंदाजांचे या स्पर्धेमध्ये महत्त्वाचे योगदान राहिले आहे कुलदीप यादव, वरून चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या त्याचबरोबर शिवम दुबे ने देखील कमालीची कामगिरी केली आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सुपर चारच्या सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी पहिला दहा ओव्हर मध्ये धुमाकूळ घातला होता.या आशिया कपमध्ये ड्यूने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुसऱ्या डावात फिरकीपटूंनी ६.७९ च्या सरासरीने धावा दिल्या आणि १८ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात ६.११ च्या सरासरीने धावा दिल्या आणि २२ विकेट्स घेतल्या.
त्यामुळे, कर्णधारांनी नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणे पसंत केले आहे. सहा सामन्यांमध्ये, नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने चार वेळा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त पाकिस्तानने दोन वेळा नाणेफेक जिंकली आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, एक जिंकला आणि दुसरा हरला. त्यामुळे, नाणेफेक जिंकल्यानंतर भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) प्रथम गोलंदाजी करतील हे निश्चित आहे.
९९ सामन्यांमध्ये, संघांनी फक्त पाच वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे, शेवटचा २०२२ च्या आशिया कपमध्ये. भारतानेही २०० धावा केल्या. आशिया कपमध्ये भारताचा सामना अफगाणिस्तानशी झाला आणि संघाने २१२ धावा केल्या. अफगाणिस्तानला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे जर टीम इंडियाने यावेळी नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी केली तर त्यांना २०० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठावे लागेल. तरच बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN) विजय सोपा होईल.