फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये चौथ्या कसोटी सामन्याला 23 जुलैपासून सुरुवात होणारा आहे. भारतीय संघासाठी हा समापार महत्त्वाचा असणार आहे लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर भारताच्या संघाला मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी या मालिकेत विजय मिळवणे गरजेचे आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यात ऋषभ पंत हा चालू सामन्यात जखमी झाला होता त्यामुळे त्याच्या जागेवर ध्रुव जुरेल हा विकेट कीपिंग करण्यासाठी आला होता. आता भारतीय संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह हा जखमी झाला आहे त्यामुळे त्याला चालू मालिका सोडावी लागली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल दिसून आला आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सराव करताना दुखापत झाली. अशा परिस्थितीत तो चौथा कसोटी सामना खेळणार नाही. अर्शदीप सिंग ज्या हाताने गोलंदाजी करतो त्याच हाताला दुखापत झाली आहे. भारताच्या सध्याच्या इंग्लंड दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
🚨 A BIG SET-BACK FOR INDIA 🚨
– Arshdeep Singh likely to be ruled out of the 4th Test against England due to an injury. [Devendra Pandey From Express Sports] pic.twitter.com/ktbRcFuclt
— Johns. (@CricCrazyJohns) July 19, 2025
२४ वर्षीय कंबोज हा भारत अ संघाचा भाग होता. गेल्या महिन्यात या संघाने २ तीन दिवसीय सामने खेळले. दोन्ही सामन्यांमध्ये त्याने पाच विकेट्स घेतल्या. इंग्लंड दौऱ्यावर या वेगवान गोलंदाजाने आपल्या वेग आणि कडक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. हरियाणाच्या या गोलंदाजाने २४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७९ विकेट्स घेतल्या आहेत.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, “अर्शदीपला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याला टाके पडले आहेत. त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान दहा दिवस लागतील. निवडकर्त्यांनी कंबोजला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.”
गुरुवारी नेट सेशन दरम्यान फॉलो-थ्रूवर साई सुदर्शनचा चेंडू थांबवताना अर्शदीपला हाताला दुखापत झाली. त्याच्या हाताला टाके लागले आहेत. अशा परिस्थितीत चौथ्या कसोटीत खेळण्याची त्याची शक्यता कमी आहे. आकाश दीपच्या उपलब्धतेबाबत अजूनही सस्पेन्स आहे. त्याला पाठदुखीचा त्रास आहे. मँचेस्टरला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाने आयोजित केलेल्या नेट सेशनमध्ये आकाश दीपने गोलंदाजी केली नाही.
अर्शदीप सिंगने अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीत २१ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. भारतीय वेगवान गोलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या ३७ डावांमध्ये ६६ बळी घेतले आहेत. भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी सिंगच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले. त्यांनी सांगितले की चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करताना त्याला दुखापत झाली होती.