फोटो सौजन्य – X (ICC)
India vs England 5th Test 1st Day Update : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या पाचवा कसोटी सामना ओवल येथे सुरू आहे. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने नाणेफेक गमावले आणि टीम इंडियाच्या नशिबी आणखी एकदा फलंदाजी आली. कालच्या पहिल्या दिने पावसाने सातत्याने हजेरी लावली होती. त्यामुळे खेळ हा बराच लांबणीवर गेला. पाऊस पडत असल्यामुळे सातत्याने फलंदाजांना फलंदाजी करण्यास अडचण येत होती. भारताच्या संघाने पहिला दिनाच्या समाप्तीनंतर सहा विकेट्स गमावून 204 धावा केल्या आहेत.
त्यामध्ये भारताचे दिग्गज फलंदाज केल राहुल यशस्वी जयस्वार रवींद्र जडेजा शुभमन गिल यांसारखे फलंदाज फेल ठरले. दोन्ही संघाने पहिल्या दिनी या शेवटच्या सामन्यांमध्ये कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यांमध्ये सध्या इंग्लंड संघाचे कर्णधारपद हे ऑली पॉप याच्याकडे आहे. ओली पॉप याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकार टीम इंडियाचा पहिला विकेट लवकर गमावला.
That’s Stumps on Day 1 of the 5th #ENGvIND Test! #TeamIndia end the rain-curtailed opening Day on 204/6.
We will be back for Day 2 action tomorrow. ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWMCJ6 pic.twitter.com/VKCCZ76MeG
— BCCI (@BCCI) July 31, 2025
भारताच्या संघाने चौथ्याच ओवलचा त्यांचा पहिला विकेट गमावला. यशस्वी जयस्वाल यांनी संघासाठी फक्त दोन धावा केल्या आणि बाद झाला. तर केएल राहुल देखील या सामन्यात त्याची मोठी छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्याने 14 धावा केल्या आणि विकेट गमावली. साई सुदर्शनला सातत्याने टीम इंडिया संधी देत आहे पण त्याने खेळलेले आत्तापर्यंत पाच इनिंगमध्ये एकदाच अर्धशतक झळकावले आहे.
शुभमन गिल याने आतापर्यंत कमालीची कामगिरी केली आहे पण तो या सामन्यात धावबाद झाला, त्याने पहिल्या इनिंगमध्ये २१ धावा करून विकेट गमावली. मागील सामन्यातील हिरो या सामन्यात स्वस्तात बाद झाला. त्याने फक्त ९ धावा केल्या आणि विकेट गमावली. सध्या भारताच्या संघाने सहा विकेट्स गमावले आहेत आणि २०४ धावा केल्या आहेत.
भारताच्या संघामध्ये ८ वर्षांनंतर संघामध्ये कमबॅक करणारा करुण नायर याला मागील तीन सामन्यात संधी मिळाली पण तो संघासाठी मोठी खेळी खेळू शकला नाही. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात पहिल्याच दिनी भारताच्या संघाने ३ विकेट्स लवकर गमावल्यानंतर त्याने कठीण काळामध्ये अर्धशतक झळकावले आहे. करुण नायर याने ५२ धावा करून नाबाद आहे. त्याची साथ सध्या वॉशिंग्टन सुंदर देत आहे. वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्या दिनाच्या समापतीपर्यत १९ धावा केल्या आहेत.