फोटो सौजन्य – X (ESPNcricinfo)
गौतम गंभीर आणि ली फोर्टिस यांच्यामध्ये झालेला वाद हा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात या विषयावर टीका टिपणी झाली. यावर क्रिकेट तज्ञांनी देखील यावर त्याचे मत मांडले होते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पिच क्युरेटर टीका झाली होती. ओव्हल स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफने सलग दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला अडवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मंगळवारी ग्राउंड्समन प्रमुख ली फोर्टिस आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात वाद झाला.
बुधवारी, भारतीय संघ सरावासाठी येताच, फोर्टिस थ्रोडाऊन स्पेशालिस्ट नुवानला अडवताना दिसला. २९ जुलै रोजी, ओव्हल येथे भारताच्या पर्यायी सराव सत्रादरम्यान, गंभीर आणि फोर्टिसमध्ये जोरदार वाद झाला. फोर्टिसने भारतीय कर्मचाऱ्यांना खेळपट्टीपासून २.५ मीटर दूर राहण्यास सांगितले आणि खेळपट्टीवर बर्फाचा डबा आणण्यास मनाई केली तेव्हा वाद सुरू झाला. यामुळे गंभीर संतापला आणि तो म्हणू लागला की तुम्ही आम्हाला काय करायचे ते सांगणार नाही.
IND vs ENG 5th Test : ऋषभ पंतची जागा घेणार हा विकेटकिपर BCCI ने दिली हिंट! शेअर केला खास Video
एवढेच नाही तर, जेव्हा प्रशिक्षक गंभीर, कर्णधार शुभमन गिल, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक अंतिम ११ जणांची निवड करण्याबाबत खेळपट्टीजवळ बोलत होते, तेव्हा फोर्टिस त्यांना तिथून दूर जाण्यास सांगताना दिसले. तथापि, या काळात गंभीरने फोर्टिसकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
ते चौघेही खेळपट्टीच्या कडेला लागले आणि खेळपट्टीच्या वरच्या बाजूला गेले. यानंतर, फलंदाज साई सुदर्शन मैदानाच्या एका बाजूला फिटनेस ड्रिल करत असताना, काही ग्राउंड स्टाफ आले आणि त्यांनी त्याला तिथून दूर जाऊन दुसऱ्या बाजूला जाण्यास सांगितले. येथे सरे काउंटीकडून खेळलेला साई दुसऱ्या बाजूला गेला.
ओवल के मैदानकर्मी भारतीय टीम को परेशान करने में कोई कसर नहीं छोड़ रहे। कल गौतम गंभीर के साथ विवाद हुआ था। आज मुख्य मैदानकर्मी पहले थ्रोडाउन स्पेशलिस्ट नुवान को टोकते नजर आए। फिर जब कोच, कप्तान, मुख्य चयनकर्ता और बल्लेबाजी कोच के बीच पिच के पास अंतिम 11 चुनने को लेकर बात हो रही थी… pic.twitter.com/AZJCuUYQye — Abhishek Tripathi / अभिषेक त्रिपाठी (@abhishereporter) July 30, 2025
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सामना होण्याआधी भारताचा कर्णधार शुभमन गिल याची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये गौतम गंभीर आणि ली फोर्टिस झालेल्या वादाबद्दल त्याला प्रश्न व्चारण्यात आला. यावेळी तो म्हणाला की मी त्यावेळी उपस्थित नव्हतो. पण पूर्णपणे अनावश्यक होते कारण याआधी देखील आम्ही पिच पाहत आलो आहोत.
कसोटी मालिकेत २-१ ने पिछाडीवर असल्याने भारताला पाचवा कसोटी सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरसारखे इंग्लंडचे खेळाडू दुखापतीमुळे खेळत नाहीत. त्याच वेळी, भारत २० विकेट्स घेण्यासाठी आकाश दीप आणि अर्शदीप सिंगसारख्या खेळाडूंवर अवलंबून आहे.