फोटो सौजन्य – X (BCCI)
टीम इंडीयाचा हा इंग्लड दौऱ्यावरील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनच्या ओवल मैदानावर खेळवला जाणार आहे. इंग्लडच्या संघाकडे या मालिकेची आघाडी आहे. त्यामुळे आता टीम इंडीयाला या मालिकेमध्ये बरोबरी करायची असल्यास पाचव्या सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. इंग्लडच्या संघाला पाचव्या सामन्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये त्यांचा कर्णधार बेन स्टोक्स हा पाचव्या सामन्यामधुन बाहेर झाला आहे. त्यामुळे आता त्याच्या जागेवर इंग्लडचा फलंदाज ऑली पाॅप हा संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.
जसप्रीत बुमराह हा पाचवा सामना खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. नितीश कुमार रेड्डी हा मालिकेमधून बाहेर झाला आहे त्याच्या जागेवर अंशुल कंबोजला संघामध्ये स्थान मिळाले होते पण अंशुल कंबोज याने चौथ्या सामन्यांमध्ये फार काही चांगली कामगिरी न केल्यामुळे त्याला बाहेर केले जाऊ शकते. मोहम्मद सिराज हा चारही सामने खेळल्यामुळे त्याला अनेक वृत्तांच्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.
Shubman Gill said – “Arshdeep Singh has been asked to get ready but we will take a call on the Playing XI after looking at the pitch, by this evening”. (Sahil Malhotra). pic.twitter.com/tu3XbqvMdO
— Tanuj (@ImTanujSingh) July 30, 2025
मोहम्मद सिराज याला विश्रांती देण्याचे टीम इंडियाने ठरवले नाही तर मोहम्मद सिराज हा भारतीय संघात असेल. त्याचबरोबर आकाशदीप सुद्धा टीम इंडियामध्ये असू शकतो तिसरा वेगवान गोलंदाज कोण असणार यावर अजूनही कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही पण अर्शदीप याचा कसोटी फॉर्मेटमध्ये पदार्पण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्शदिप याला झालेल्या इंग्लंड दौऱ्यावरील चारही सामन्यांमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती त्यामुळे पाचव्या सामन्या त्याला संधी मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
IND vs ENG 5th Test : इंग्लडविरुद्ध पाचव्या बुमराह खेळणार की नाही? भारताच्या कर्णधाराने केलं स्पष्ट
भारताच्या फलंदाजांनी चौथ्या सामन्यांमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली कामगिरी केली होती त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोघांना संघामधून बाहेर केले जाणार नाही असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे आता भारताचा संघ तिसऱ्या फिरकी गोलंदाजाला म्हणजेच कुलदीप यादवला संधी देणार का याकडे सुद्धा क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. कुलदीप यादवला आत्तापर्यंत एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही पण त्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यांना आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.