फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यमध्ये काही वेळातच मालिकेतील एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. याआधी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी अपडेट आली आहे. या सामन्यात टीम इंडियासाठी दोन खेळाडू पदार्पण करत आहेत.
यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण करत आहेत. राणाने नुकतेच टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. त्याच वेळी, यशस्वी जयस्वाल टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्येही धमाकेदार कामगिरी करण्यास सज्ज आहे.
टॉस दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, विराट कोहलीला सध्या गुडघ्याचा त्रास आहे. यामुळे तो खेळत नाहीये. त्याच्या जागी यशस्वी जयस्वालला संधी मिळाली आहे. क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, विराट कोहलीच्या उजव्या गुडघ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तो संघासोबत सराव सत्रात सामील होत असताना सावधगिरीने चालत होता.
𝘼 𝙢𝙤𝙢𝙚𝙣𝙩 𝙩𝙤 𝙘𝙝𝙚𝙧𝙞𝙨𝙝 𝙛𝙤𝙧 𝙔𝙖𝙨𝙝𝙖𝙨𝙫𝙞 𝙅𝙖𝙞𝙨𝙬𝙖𝙡 & 𝙃𝙖𝙧𝙨𝙝𝙞𝙩 𝙍𝙖𝙣𝙖! 👏 👏
ODI debuts ✅ ✅ as they receive their ODI caps from captain Rohit Sharma & Mohd. Shami respectively! 👍 👍
Follow The Match ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#TeamIndia |… pic.twitter.com/R9p2apskrS
— BCCI (@BCCI) February 6, 2025
“जयस्वाल आणि हर्षित पदार्पण करत आहेत, दुर्दैवाने विराट खेळत नाहीये, काल रात्री त्याला गुडघ्याचा त्रास झाला होता,” रोहित शर्माने टॉस दरम्यान सांगितले.
सामन्याबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की त्याला प्रथम गोलंदाजी करायची होती, त्यामुळे नाणेफेक हरणे देखील भारताच्या बाजूने होते.
हिटमन म्हणाला, “आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती, पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही. सुरुवातीला चेंडूवर आक्रमक राहावे लागेल आणि नंतर चांगली कामगिरी करावी लागेल. थोडा वेळ विश्रांती घेणे चांगले आहे, ही एक नवीन सुरुवात आहे आणि चांगली कामगिरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. खेळण्यासाठी थोडा वेळ काढणे खूप महत्वाचे आहे, आपल्याकडे असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करणे.”
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, के. एल. राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, हर्षित राणा, कुलदीप यादव.
फिल्ल सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, ब्रायडॉन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद