फोटो सौजन्य – X (BCCI)
India vs England 2nd Test Match Report : टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमधील दोन सामने आत्तापर्यंत पार पडले आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी अशी केली आहे. पहिल्या सामन्याच्या पराभवानंतर भारतीय गोलंदाजांवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते पण दुसऱ्या सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली आणि सामन्यात विजय मिळवून दिला यामध्ये मोलाचे योगदान म्हणजेच आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या दोघांचे राहिले.
दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावांमध्ये भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद सिराज यांने संघाला सहा विकेट्स मिळवून दिले तर त्याची साथ ही आकाशदीपने दिली. त्याने पहिल्या डावामध्ये चार विकेट्स मिळवून दिले होते. त्यानंतर दुसरा डावांमध्ये मोहम्मद सिराज ने फक्त एक विकेट घेतला आकाशदीपने संघाला सहा विकेट्स मिळवून दिले आणि सामन्यात दहा विकेट्स कमावले. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीमध्ये आकाशदीपला संघामध्ये स्थान मिळाले होते.
जसप्रीत बुमराहला संघामध्ये स्थान न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅप्टन शुभमन गिल आणि कोच गौतम गंभीर यांच्यावर टीका करण्यात आली होती. ती फक्त सोशल मीडियावरच नाही त्या अनेक क्रिकेट तज्ञांनी देखील त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. पण भारताच्या गोलंदाजांनी जसप्रीत बुमराह त्याचबरोबर शार्दुल ठाकूर सारख्या महत्त्वाच्या खेळाडू संघात नसताना चांगली कामगिरी करून सामना जिंकून दिला.
एजबॅस्टनमध्ये भारताचे संघाने आतापर्यंत एकही विजय मिळवला नव्हता. कपिल देव यांच्या कॅप्टन्सीमध्ये भारताच्या संघाने सामना बरोबरीत संपवला होता. याव्यतिरिक्त भारताने एकही सामन्यात विजय मिळवण्यास इंडिया अपयशी ठरली होती. एजबॅस्टनमध्ये भारताच्या संघाचा हा पहिला विजय आहे आणि हा विजय शुभमन गिल याच्या कॅप्टनसीमध्ये मिळाला आहे.
A historic win at Edgbaston 🙌#TeamIndia win the second Test by 336 runs and level the series 1-1 👍 👍 Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF #ENGvIND pic.twitter.com/UsjmXFspBE — BCCI (@BCCI) July 6, 2025
शुभमन गिलयाने कर्णधार म्हणूनच चांगली कामगिरी केली नाहीत तर एक फलंदाज म्हणून देखील त्याने संघासाठी द्विशतक पहिल्या डावामध्ये जरा लावले होते. त्याचबरोबर दुसऱ्या डावामध्ये त्याने शतक झळकावून सर्वात मोठी धावसंख्या करणारा भारतीय संघाचा पहिला फलंदाज ठरला. या व्यतिरिक्त रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि केएल राहुल या फलंदाजाने देखील चांगली कामगिरी करून भारताच्या संघाला विजय मिळवून देण्यात मुलाचे योगदान दिले.