जसप्रीत बूमराह(फोटो-सोशल मीडिया)
Jasprit Bumrah equals Ashwin’s record with Kapil Dev : भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेऊन इंग्लिश संघाची कंबर मोडली. त्याच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला ६ धावांची आघाडी मिळवता आली. यासह, जसप्रीत बुमराहने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेण्याच्या बाबतीत रविचंद्रन अश्विनसोबत बरोबरी साधली आहे. तसेच त्याने परदेशी भूमीवर सर्वाधिक पाच विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज म्हणून कपिल देवच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली आहे.
अश्विनने भारतासाठी ४१ डब्ल्यूटीसी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ११ वेळा पाच विकेट्स मिळवल्या आहेत. तर बुमराहच्या नावावर ३६ डब्ल्यूटीसी सामन्यांमध्ये ११ वेळा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात बुमराहने ८३ धावा देऊन इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवले आहे. डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये बुमराह आणि अश्विननंतर पॅट कमिन्स आणि नाथन लायन यांचा नंबर लागतो. ज्यांनी प्रत्येकी १० पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
हेही वाचा : ‘मुख्यमंत्री होण्याची ऑफर…’, माजी क्रिकेटर ‘दादा’ गाजवणार राजकीय मैदान? अखेर सौरव गांगुलीने मौन सोडले..
जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेत आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. तो आता भारताबाहेर १२ वेळा पाच विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. बुमराहने ३४ कसोटीत ही कामगिरी करून दाखवली आहे. तर कपिल देव यांनी ६६ कसोटीत ही कामगिरी केली होती. कपिल देव यांनी देखील १२ वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. त्याच्यानंतर इशांत शर्माने ९, झहीर खानने ८ आणि इरफान पठाणने ७ वेळा भारताबाहेर पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.
हेही वाचा : ‘रोहित-कोहली २०२७ च्या विश्वचषकात दिसणार नाहीत’, माजी भारतीय खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी…
जसप्रीत बुमराने पहिल्याच षटकात जॅक क्रॉलीला माघारी पाठवून संघाला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतर बुमराहने बेन डकेटला बाद केले. त्यांनंतर बुमराहने घातक ठरत जाणाऱ्या जो रूटला आपली शिकार बनवले. तिसरे यश मिळवले. त्यानंतर बुमराहने ख्रिस वोक्स आणि जोश टँग यांना बाद करून पाच विकेट्स पूर्ण केल्या. बुमराहने ८३ धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या.