फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या दिनी ४ विकेट्स घेतले. तर इंग्लडच्या संघाने पहिल्या दिनी 251 धावा केल्या आहेत. नितिश कुमार रेड्डी याने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतले आणि इंग्लडच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडने फलंदाजी करताना २५१ धावा केल्या. या दरम्यान इंग्लंडला ४ मोठे धक्केही सहन करावे लागले.
जो रूट त्याच्या शतकापासून फक्त १ धाव दूर आहे. दुसरीकडे, टीम इंडियाकडून पहिल्या दिवशी नितीश रेड्डीने सर्वाधिक २ बळी घेतले, जरी सर्व गोलंदाजांनी अद्भुत गोलंदाजी सादर केली. कसोटीत जसप्रीत बुमराहने नंबर-१ फलंदाज हॅरी ब्रूकला ज्या पद्धतीने बाद केले ते खूपच आश्चर्यकारक होते. या सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रात जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळू शकली नाही, जी टीम इंडियासाठी चिंतेची बाब होती.
IND vs ENG : जो रूटची विकेट भारताच्या हाती लागेना! वाचा पहिल्या दिनाचा संपूर्ण अहवाल
कारण बुमराह अनेकदा पहिल्या सत्रातच १ किंवा २ विकेट घेतो, परंतु पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी बुमराहविरुद्ध समजूतदार फलंदाजी केली, परंतु बुमराह थांबणार नव्हता. त्याला पहिल्या दिवशी हॅरी ब्रूकच्या रूपात पहिले यश मिळाले. कसोटी क्रमांक-१ फलंदाज हॅरी ब्रूक बुमराहच्या शानदार चेंडूवर जमिनीवर सपाट बाद झाला. पहिल्या डावात फक्त ११ धावा काढून हॅरी पॅव्हेलियनमध्ये परतला.
Bumrah’s magic > Brook’s magic
Even Harry couldn’t escape this spell 🤩
#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/oPzFwFdMIt— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 10, 2025
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने २५१ धावा केल्या. जो रूट पुन्हा एकदा लॉर्ड्सच्या मैदानावर शानदार फलंदाजी करताना दिसला. या मैदानावर रूटचा रेकॉर्ड खूपच प्रभावी आहे. त्याने आतापर्यंत लॉर्ड्सवर ७ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत, त्यानंतर रूट आता लॉर्ड्सवर आठवे शतक झळकावण्यापासून फक्त १ धाव दूर आहे.
भारताच्या संघासाठी दुसरा दिवस महत्वाचा असणार आहे, कारण यादिवशी भारताच्या संघाला विकेट्स घ्यावे लागणार आहेत. भारताचे फलंदाज जसप्रीत बुमराह त्याचबरोबर आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.