फोटो सौजन्य – X
चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची प्लेइंग-११ : इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीसाठी भारत काही तासातच मॅचेस्टरमध्ये सामना खेळताना दिसणार आहे. 23 जुलै रोजी बुधवारी दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. लॉर्ड्स कसोटी नंतर भारतीय संघामध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर इंग्लंड संघाने आता मॅचेस्टर कसोटी आधी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे, शोएब बशीर या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी इंग्लंडने आठ वर्षांनंतर एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे. उर्वरित संघात इतर कोणताही बदल केलेला नाही.
लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बशीरला दुखापत झाली होती. त्याने सामन्यातील शेवटचे षटक टाकले आणि मोहम्मद सिराजची महत्त्वाची विकेट घेऊन भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. तथापि, तो वेदनांनी त्रस्त होता. यानंतर, ईसीबीने सांगितले होते की तो पुढील कसोटी सामन्यात खेळणार नाही.
बशीरच्या जागी ईसीबीने लियाम डॉसनला संघात बोलावले होते. आठ वर्षांनी तो प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळवू शकेल असे मानले जात होते आणि तेच घडले आहे. बेन स्टोक्सने प्लेइंग-११ मध्ये डॉसनची निवड केली आहे. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने २०१६ मध्ये चेन्नई येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने जुलै २०१७ मध्ये शेवटचा सामना खेळला होता.
डॉसनने आतापर्यंत इंग्लंडसाठी फक्त तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्याने भारताविरुद्ध पहिला सामना खेळला ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात ६६ धावा केल्या आणि संपूर्ण सामन्यात एकूण दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर, त्याने २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चेंडू आणि बॅटने प्रभावी कामगिरी करून डॉसनने संघात पुनरागमन केले आहे. याशिवाय इंग्लंडने संघात इतर कोणतेही बदल केलेले नाहीत. बशीर व्यतिरिक्त, लॉर्ड्समध्ये असलेले १० खेळाडू अजूनही संघात आहेत.
Our XI for the fourth Test is here 📋 One change from Lord’s 👊 — England Cricket (@englandcricket) July 21, 2025
बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर