फोटो सौजन्य – X
शोएब बशीर जखमी : भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे या मालिकेचे तीन सामने आत्तापर्यंत खेळवण्यात आले. भारताच्या संघाला तीन सामन पैकी एक समय विजय मिळाला आहे तर दोन सामन्यांमध्ये इंग्लंडचे संघाने विजय नावावर केला आहे. इंग्लंडच्या संघाने मागील दोन सामन्यात फार काही चांगली गोलंदाजी केली नव्हती पण त्यांनी लॉर्ड्स कसोटीमध्ये गोलंदाजी सुधारली आणि त्यांच्या विजयाचे कारण देखील ठरले. यामध्ये दुखापत झालेला शोएब बशीर याने एक हाताने गोलंदाजी आणि फिल्डिंग देखील केली. लोटस कसोटीमध्ये जखमी असताना देखील शोएब बशीर आणि त्याच्या गोलंदाजीने विकेट्स घेऊन इंग्लंडच्या संघाला विजय मिळवून दिला.
आता त्याच्या संदर्भात मोठे अपडेट समोर आली आहे. लॉर्ड्स टेस्टचा हिरो स्पिनर शोएब बशीर उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. तिसऱ्या कसोटीदरम्यान बशीरच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते, ज्यामुळे तो पुढील सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. २१ वर्षीय बशीरवर या आठवड्यात शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शोएब बशीरने भारताचा शेवटचा बळी घेतला आणि रोमांचक सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून दिला हे तुम्हाला आठवण करून देतो.
🚨 After sustaining a fracture to his left finger, Shoaib Bashir has been ruled out of the remainder of the Test series against India pic.twitter.com/00o0edudFv — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 14, 2025
त्याने मोहम्मद सिराजला बाद करून यजमान संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) लवकरच शोएब बशीरच्या जागी खेळाडूची घोषणा करेल.
इंग्लंडच्या पुरुष संघाचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि तो भारताविरुद्धच्या उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. या आठवड्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. इंग्लंड पुढील काही दिवसांत चौथ्या कसोटीसाठी त्यांचा संघ जाहीर करेल.
IND vs ENG : Vaibhav Suryavanshi ने इंग्लडची उडवली झोप! मायकेल वॉनच्या मुलाचा घेतला विकेट
लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बशीरच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली होती. रवींद्र जडेजाने त्याच्या चेंडूवर एक शक्तिशाली शॉट मारला, जो गोलंदाजाच्या दिशेने गेला. शॉट थांबवण्याचा प्रयत्न करताना बशीरला दुखापत झाली. भारताच्या दुसऱ्या डावात बशीरने फक्त ५.५ षटके टाकली, पण शेवटची विकेट घेऊन तो विजयाचा हिरो बनला. १९३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा दुसरा डाव १७० धावांवर आटोपला. इंग्लंडने हा सामना २२ धावांनी जिंकला आणि मालिकेत आघाडी घेतली. आता दोन्ही देशांदरम्यान २३ जुलैपासून चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे.






