फोटो सौजन्य – YouTube (England & Wales Cricket Board)
भारताच्या पुढे संघाला काल लॉर्ड्स कसोटीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे भारतीय युवा अंडर 19 संघ देखील इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. पहिल्या डावामध्ये भारताच्या संघाने पहिली फलंदाजी करत 540 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या गावात इंग्लंडच्या संघाला भारतीय संघाने 439 धावांवर रोखले. तिसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे भारताच्या संघाने सामन्याच्या तिसऱ्या दिन तीन विकेट्स कमावून 27 ओव्हरमध्ये 128 धावा केल्या आहेत.
इंग्लंड अंडर-१९ आणि भारत अंडर-१९ यांच्यातील पहिला युवा कसोटी सामना बेकेनहॅम येथील केंट काउंटी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. सामन्याचा तिसरा दिवस संपला आहे. दुसऱ्या डावात ३ विकेट गमावल्यानंतर भारताने १२८ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडे अजूनही २२९ धावांची आघाडी आहे. पुन्हा एकदा, तरुण वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीने भारतासाठी शानदार कामगिरी केली. त्याने सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले. यापूर्वी, वैभवने इंग्लंडच्या पहिल्या डावात २ बळी घेऊन इतिहास रचला होता. वैभव सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
AUS vs WI : W,W,W कांगारूच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला मालिकेत पछाडल! इनिंगमध्ये फक्त 27 धावा
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या २३०/५ आहे. एकांश सिंग आणि थॉमस रीव्ह बाद झाले. तिसऱ्या दिवशी यष्टीरक्षक थॉमस ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर एकांश सिंगने ८९ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. राल्फी अल्बर्टने अर्धशतक झळकावले. त्याने ६२ चेंडूत ५० धावांची खेळी केली. जेम्स मिंटोच्या बॅटमधून २० धावा आल्या. जॅक होमने ४४ धावांची खेळी केली. हेनिल पटेलने ३ बळी घेतले. आरएस अँब्रिस आणि वैभव सुयवंशी यांनी २-२ बळी घेतले.
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली. वैभव सुयवंशीने कर्णधार आयुष म्हात्रेसोबत ७७ धावांची भागीदारी केली. आयुष म्हात्रे ३२ धावांवर झेलबाद झाला. त्याने ४३ चेंडूंचा सामना केला आणि ५ चौकार मारले. अर्धशतक झळकावणारा वैभव २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आर्ची वॉनचा बळी ठरला. वैभवने १२७.२७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि ४४ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि १ षटकार मारला.
मौल्यराज सिंग चावडा जास्त काळ मैदानावर टिकू शकला नाही आणि फक्त ३ धावाच करू शकला. दुसऱ्या डावातील तिन्ही विकेट मायकल वॉनचा मुलगा आर्ची वॉनने घेतल्या. खेळ थांबला तेव्हा विहान मल्होत्रा ५२ चेंडूत ३४ धावांवर नाबाद आहे. यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडूचे खाते अद्याप उघडलेले नाही.