फोटो सौजन्य - सोशल मीडिया
वरूण चक्रवर्ती : आज भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेचा दुसरा सामना रंगणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत मालिकेच्या पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करून इंग्लंडच्या संघाला १३२ धावांवर बाद केले. यामध्ये विशेष कामगिरी वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि अर्शदीप यांनी दमदार गोलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले.
भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती म्हणाला की, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची पातळी आयपीएलच्या बरोबरीने आहे आणि क्रिकेटपटूंनी T२० फॉरमॅटमध्ये आपला खेळ सुधारण्यासाठी अधिकाधिक देशांतर्गत स्पर्धा खेळल्या पाहिजेत. कोलकाता येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात चक्रवर्तीने तीन विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. दुसऱ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘‘देशांतर्गत क्रिकेटचा स्तर खूप वरचा आहे. मी आयपीएल किंवा इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बरोबरीने म्हणेन. मी सर्वांना सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देईन कारण आम्ही लहान मैदानांवर खेळतो, हे खूपच आव्हानात्मक आहे.
IND vs ENG : दुसऱ्या T20 मध्ये कसे असेल हवामान, पावसामुळे चाहते मजा लुटणार का? वाचा सविस्तर
तो म्हणाला, “मला सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंट खेळणे खूप कठीण वाटते. तो खेळून माझ्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. चक्रवर्तीने या मोसमात विजय हजारे ट्रॉफीमध्ये १८ तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सात सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या होत्या. T२० क्रिकेटच्या तयारीबद्दल बोलताना तो म्हणाला, “सर्व प्रथम, मी फलंदाजांचे व्हिडीओ पाहतो की ते सुरुवातीला त्यांचे शॉट कसे खेळतात आणि नंतर कसे खेळतात. त्याने कोणते नवीन शॉट्स खेळायला सुरुवात केली आहे? मी या सर्वांचे विश्लेषण करतो.”
पुढे तो म्हणाला, “खेळपट्टीकडे पाहता काही शॉट्स जातात आणि काही नाहीत. हे सर्व लक्षात घेऊन मी तयारी करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याला तीन वर्षे वाट पाहावी लागली पण त्याने हार मानली नाही.
अर्शदीप सिंगने चेन्नई T२० मध्ये तीन विकेट घेतल्यास तो १०० T२० विकेट घेणारा भारताचा पहिला गोलंदाज बनेल. होय, अर्शदीपनंतर या यादीत युजवेंद्र चहल आहे, ज्याच्या नावावर या फॉरमॅटमध्ये ९६ विकेट आहेत. अर्शदीप सिंगच्या T20I कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत खेळलेल्या ६१ सामन्यांमध्ये त्याने १७.९० च्या सरासरीने आणि ८.२४ च्या इकॉनॉमीने ९७ बळी घेतले आहेत, तो त्याच्या शतकापासून फक्त ३ विकेट दूर आहे.