किवींच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाचा डाव कोसळला; वरच्या फळीतले फलंदाज पॅव्हेलिनमध्ये
IND vs NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंज दुसऱ्या कसोटी सामन्यात काल कर्णधार रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर आज सकाळी शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. गिलला बराच वेळ सूर गवसत नव्हता. परंतु, यशस्वी चांगलाच सेट झालेला दिसला. शुभमन गिलला खेळताना अनेक अडचणी येत असल्याचे दिसून आले. अखेर शुभमन गिल सॅन्टनरच्या चेंडूवर पायचित होत पॅव्हेलिनमध्ये परतला. त्यानंतर विराटला देखील सॅन्टरने क्लिनबोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर यशस्वी जयस्वालला ग्लेन फिलिप्सने यशस्वीला डॅरिल मिचेलच्या द्वारे झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतलासुद्धा ग्लेन फिलिप्सने क्लिनबोल्ड केले. त्यानंतर ऋषभ पंतलासुद्धा क्लिनबोल्ड करीत पॅव्हेलिनमध्ये पाठवले.
न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी घसरली
New Zealand spun a web around India's batters in Pune this morninghttps://t.co/3D1D83IgS1 #INDvNZ pic.twitter.com/vYoaOz0adv
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 25, 2024
सॅन्टनरने निम्मा संघ बाठवला तंबूत
भारतीय क्रिकेट टीमच्या आज लागोपाठ ४ विकेट गेल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडकडून सॅन्टर टीम इंडियाला जखडून ठेवले. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळपट्टीने फिरकीपटूंना चांगलीच साथ दिली आहे. च्या दिवसात रविचंद्रन अश्विननंतर वाॅशिंग्टन सुंदरने धमाकेदार गोलंदाजीने किवींचा डाव उधळला आणि त्यांना २५९ धावांपार्यंतच रोखून धरले. सरफराज खानदेखील एक मोठा शॅाट मारण्याच्या नादात सोपा झेल मिडअॅानला देऊन बाद झाला. सॅन्टरने आज ४ विकेट घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. दुपारच्या सत्रापर्यंत निम्मा भारतीय संघ तंबूत परतला होता. त्यामुळे आता मॅच कुठपर्यंत चालते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पहिले यश रविचंद्रन अश्विनने मिळवून दिले
आज गहुंजेच्या पिचवर फिरकीपटूंचा बोलबाला चालला. प्रथम रविचंद्रन अश्विनने भारताला यश मिळवून दिले. वरच्या फळीतल्या महत्त्वाचे फलंदाज बाद करीत न्यूझीलंडच्या धावसंख्येला रोखून धरले. भारताने न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवल्याने त्यांना धावा करणे कठीण गेले. अश्विनने कर्णधार टॅाम लॅथम, काॅन्वे, यंगला तंबूचा रस्ता दाखवला. तर बाकीचे सर्व फलंदाज वॉशिंग्टन सुंदरने पॅव्हेलिनमध्ये परत पाठवले.
वॉशिंग्टन सुंदरचा बोलबाला
आज वॉशिंग्टन सुंदरचा बोलबाला चालला, रचिन रवींद्र या न्यूझीलंडच्या सेट फलंदाजाला क्लिन बोल्ड करीत सुंदरने पहिली विकेट घेतली. त्यानंतर डॅरी मिचेल, टोम ब्लंडल, ग्लेन फिलीप्स, एजाज पटेलसह टीम साऊथीला सुंदरने त्रिफळाचित केले. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर किवींचा डाव 259 धावांवर रोखला गेला. यामध्ये सुंदरने आज अचूक गोलंदाजी करीत किवींची मधल्या आणि शेवटच्या फळीतील फलंदाज तंबूत धाडले.
गौतम गंभीरकडून वॉशिंग्टन सुंदरची स्तुती
कालच गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेत वॉशिंग्टन सुंदरचे गोडवे गायले होते. यामध्ये त्याने वॉशिंग्टन सुंदरवर अधिक भर देत त्याला निश्चितपणे खेळवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आज त्याचा हा विश्वास वॉशिंग्टन सुंदरने सार्थ केला. भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात टीम इंडियाने आपली रणनीती राखून ठेवली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. वॉशिंग्टन सुंदर हा संघाचा भाग असणार, तरीही उद्याच सर्व अंदाज घेऊन ठरवणार प्लेईंग इलेव्हन तसेच आम्ही उद्या पिच आणि नाणेफेक आमच्यासाठी महत्त्वाची राहणार आहे. हे सर्व पाहूनच खेळाडूंची यादी ठरवू, शुभमन गिल आणि वाॅशिंग्टन संदर निश्चितच संघाचे भाग राहतील परंतु पिच आणि इतर सर्व बाजू पाहूनच आम्ही निर्णय घेणार असल्याचे गौतम गंभीर यांने सांगतिले. यांमध्ये निश्चितच केएल राहुलचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
पुणे टेस्ट जिंकण्याच्या उद्देशाने प्लेईंग इलेव्हन
उद्या आम्ही पिचचा अंदाज घेऊन खेळाडू ठरवणार आहोत. तरी आपल्या येथे टॅलेंट एवढे आहे की, कोणता खेळाडू ठेवायचा कोणता काढायचा हा मोठा प्रश्न आमच्यासमोर असतो. तरी आम्ही यावर निश्चितच उपाय काढून विजयासाठी आवश्यक तयारी करू. असे नाही की हा फक्त पुण्यात प्रश्न येतो असा प्रश्न अनेक ठिकाणी येतो त्याचे कारण म्हणजे भारतात टॅलेंट खूप आहे.