ऋतुराज गायकवाडने झळकवले शतक(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिका संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजी करत आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी करत शतक झळकवले आहे. ऋतुराजने ७८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताची धावसंख्या ४० वर असताना भारताला रोहित शर्माच्या रूपाने पहिला झटका बसला. त्याला नांद्रे बर्गरने बाद केले. रोहित शर्माने १४ धावा केल्या. तर त्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. रोहित नंतर यशस्वी जैस्वाल देखील लवकर बाद झाला. तो २२ धावा करून माघारी गेला. त्यानंतर मैदानात आलेला ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांनी डाव आपल्या हातात घेतला. या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. तसेच या दोघी खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना एक देखील संधी दिली नाही. या दरम्यान ऋतुराज गायकवाडने ७८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतकं नंतर तो जास्त वेळ मैदानावर राहू हकला नाही, ऋतुराज गायकवाड ५३ चेंडूत १०५ धावा करून बाद झाला. यांमदये त्याने १२ चौकार आणि २ षटकार मारले. त्याला मार्को जॅनसेनने बाद केले.
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रदीप सिंह,
दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जिओर्गी, 7 मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, एनगिडी .






