फोटो सौजन्य - सोशल मिडिया
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. भारताच्या या निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात खेळाडूंवर त्याचबरोबर गौतम गंभीरवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला आफ्रिकन संघाने ४०८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या घरच्या मैदानावर टीम इंडियाचा क्लीन स्वीप पूर्ण केला आणि २५ वर्षांनंतर मालिका २-० ने जिंकली.
या कसोटी मालिकेत टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्यानंतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी संघावर टीका केली आहे आणि खेळाडूंना लक्ष्य केले आहे. सोशल मिडियावर दिग्गजांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भारताच्याच दिग्गजांनीच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या देखील कोचने भारताला खराब पद्धतीने ट्रोल केले. या संदर्भात, माजी भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारतीय खेळाडूंवर टीका करताना एक कठोर सत्य उघड केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या व्हाईटवॉशनंतर आर अश्विनने नाराजी व्यक्त केली. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “२०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर मी स्वतःला सांगितले होते की जर आपण पुन्हा एकदा घरच्या मालिकेत हरलो तर मी निवृत्त होईन. न्यूझीलंड मालिकेतील पराभव माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्यामुळे मी तुटलो आणि आज मी घरी बसलो आहे.” तो पुढे म्हणाला, “मला आशा आहे की या मालिकेनंतर खेळाडूंसोबतही असेच घडेल आणि ते स्वतःला बदलतील.”
Ravi Ashwin said, “I made myself a promise after the series loss against England in 2012 that if we ever lose another home series, I’ll retire. New Zealand series loss is eventually the reason why I am sitting at home today, it broke me”. (Ash Ki Baat). pic.twitter.com/FStbxQFThs — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2025
न्यूझीलंडमधील व्हाईटवॉशनंतर, अश्विनने गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यभागी अचानक निवृत्तीची घोषणा केली. २०२४-२५ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी (ब्रिस्बेन) नंतर त्याने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याचा निर्णय कोणत्याही दबावाखाली नव्हता.
तो म्हणाला, “मला कोणीही संघ सोडण्यास सांगितले नाही. उलट, दोन-तीन जणांनी मला निवृत्तीविरुद्ध सल्ला दिला. त्यांना मी अधिक खेळावे असे वाटत होते.” अश्विन पुढे म्हणाले की, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांनीही त्याला पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. तो पुढे म्हणाला, “निवृत्ती हा वैयक्तिक निर्णय आहे. हे निर्णय इतरांनी घेतलेले नाहीत, तर ते स्वतः घेतलेले आहेत.”






