संजू सॅमसनच्या शॉटने पंच जखमी(फोटो-सोशल मीडिया)
Rohan Pandit collapsed on the field : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका ३-१अशी जिंकली. या सामन्यात एक घटन घडली. सामन्यादरम्यान, संजू सॅमसनचा एक शॉट पंचाच्या उजव्या गुडघ्यावर जाऊन लागला, ज्यामुळे ते जमिनीवर पडले. फिजिओने मैदानात येऊन त्यांनी त्वरित तपासणी केली. ते काही वेळ उभा राहू शकला नाही, परंतु नंतर तो पंच म्हणून काम पाहू लागले.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद २३१ धावा उभ्या केल्या. भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची चांगली भागीदारी करत दमदार सुरुवात केली होती. अंपायरसोबत झालेल्या या घटनेनंतर, संजू सॅमसन जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. तो संजूने २२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावा करून बाद झाला. अभिषेक शर्मानेही उत्कृष्ट खेळ दाखवत २१ चेंडूत ३४ धावा केल्या. हार्दिक पंड्याने या सामन्यात चांगली खेळी केली. त्याने २५ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. या खेळीत ५ चौकार आणि ६ षटकार लगावले. तिलक वर्माने देखील शानदार खेळी साकारली त्याने ४२ चेंडूत ७३ धावा करून धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि १ षटकार लगावला. भारताच्या फलंदाजांच्या शानदार खेळीच्या जोरावर २३१ धावांचा डोंगर उभा केला.
That one must have hurt. 🩹@IamSanjuSamson times this one sweetly and the ball rockets off the bowlers hand and umpire Rohan Pandit cops a nasty blow to his shin. 🫣😵💫#INDvSA 5th T20I | LIVE NOW 👉 https://t.co/adG06ykx8o pic.twitter.com/T4XdtqK9jA — Star Sports (@StarSportsIndia) December 19, 2025
भारतीय डावाच्या ९व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, संजू सॅमसनने एक फटका मारला. चेंडू गोलंदाज डोनोवन फेरिअरच्या हातातून सुटला आणि पंच रोहन पंडितच्या पायाला जाऊन लागला. पंच प्रचंड वेदनांमध्ये दिसून आले आणि त्यांना त्याच्या पायावर उभे राहता येत नव्हते. ते जमिनीवर पडून राहिले. फिजिओथेरपिस्ट मैदमनावर आले. फिजिओथेरपिस्टने ताबडतोब त्याच्यावर उपचार केले, त्यानंतर पंच मैदानात परतले.
भारताने प्रथम फलंदाजी करत २३१ धावा केल्या. प्रतिउत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकात २०१ ढवाच करू शलकला. परिणामी दक्षिण आफ्रिकेला पराभवाला सामोरे जावे लागले आणि भारताने मालिका विजय प्राप्त केला.






