फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवून आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघासाठी शतके झळकावली. तर पहिल्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल आणि केएल राहुलने शतके झळकावली होती. सुरु असलेल्या सामन्यामध्ये साई सुदर्शन याला फिल्डिंग करताना दुखापत झाली आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
दिल्ली कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीलाच बीसीसीआयने टीम इंडियाचा फलंदाज साई सुदर्शनबाबत एक मोठी अपडेट जारी केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले आहे की दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साई सुदर्शन क्षेत्ररक्षण करणार नाही. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झेल घेताना साई सुदर्शनला दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. दुखापत फार गंभीर नसावी यासाठी, त्याला तिसऱ्या दिवशी खेळापासून दूर ठेवण्यात येईल.
बीसीसीआयने म्हटले आहे की, “दुसऱ्या दिवशी कॅच घेण्याच्या प्रयत्नात साई सुदर्शनला दुखापत झाली होती. खबरदारी म्हणून, तो आज मैदानात उतरला नाही. दुखापत गंभीर नाही आणि तो बरा आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.” हर्षित राणा सध्या त्याचा क्षेत्ररक्षण पर्याय असेल. तथापि, वेळोवेळी साई सुदर्शनच्या जागी दुसरा क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसू शकतो. चांगली बातमी अशी आहे की गरज पडल्यास तो फलंदाजीसाठी येऊ शकतो, परंतु सामन्याची सध्याची परिस्थिती पाहता, फलंदाजीची आवश्यकता राहणार नाही.
🚨 UPDATE ON SAI SUDHARSAN 🚨 Sai Sudharsan had an impact injury on Day 2 while attempting a catch. He has not taken the field today as a precautionary measure. The injury is not serious, and he is doing fine. He continues to be monitored by the BCCI Medical Team pic.twitter.com/dJ9oyVO9Wo — Cricbuzz (@cricbuzz) October 12, 2025
खरं तर, भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ५०० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर पहिला डाव घोषित केला. वेस्ट इंडिजचा पहिला डाव अजूनही सुरू आहे, परंतु पाच फलंदाज आधीच पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. जर संघ ३१५ च्या आसपास कोसळला तर भारत फॉलोऑन देखील देऊ शकतो, कारण वेस्ट इंडिजची फलंदाजी खूपच खराब आहे. पहिल्या कसोटी सामन्यातही भारताने भारताचा डावाच्या फरकाने पराभव केला. अहमदाबादमध्ये टीम इंडियाने एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला. दिल्ली कसोटी सामन्यात कॅरेबियन संघासोबतही असेच काहीसे घडू शकते.