स्मृती मानधना विकेट वाद (फोटो-सोशल मीडिया)
IND W vs AUS W Semi Final Live : आज महिला एकदिवसीय विश्वचषकात आज दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ फायनलमध्ये पोहचण्यासाठी खेळत आहे. हा सामना नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामान्यायाधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३३८ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रतिउत्तरात भारताने आक्रमक सुरवात केली. त्यात शेफलीची विकेट गेली. मात्र या सामन्यात ड्रामा झाला तो म्हणजे स्मृती मानधनाची विकेट होती की नाही. कारण, ती विकेट झाली यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे आता यावर वादाला तोंड फुटले आहे.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर डोंगराइतके लक्ष्य दिले. त्यामुळे भारतीय संघावर थोडे दडपण होते. परंतु, शेफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने ते दिसू दिले नाही. शेफाली वर्माने आक्रमक सुरुवात केली. मात्र, ती १० धावांवर बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी भारताचा डाव सावरला. स्मृती मानधना शानदार खेळत होती. परंतु, किम गार्थच्या १० ओव्हरमधील २ चेंडूवर मात्र मानधनाच्या बॅटला चेंडू लागून गेल्याची अपील ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आले. तेव्हा आपला झेल गेला असावा यावर मानधनाला देखील विश्वास बसला नाही.
नंत DRS घेण्यात आला. कारण मानधनाचे आऊट होणे ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्वाचे होते. त्यामुळेच स्मृतीची विकेट मिळवल्यानंतर ऑसी खेळाडूंचा जल्लोष करण्यात आला. मात्र, त्याचवेळी भारतीय चाहत्यांमध्ये शांतता पसरली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्मृतीच्या विकेटने आता नव्या वादात सापडली. कारण, चेंडू व बॅट यांच्यात संपर्क झालाच नव्हता, असा स्मृतीकडून दावा करण्यात आला होता. पण, काही उपयोग झाला नाही, तिसऱ्या अम्पायरने तिला बाद दिल्याने तिलाही आश्चर्य वाटले. अखेर स्मृती मानधनाला २४ धावांवर माघारी जावे लागले. तेव्हा भारतीय चाहत्यांची मोठी निराशा झाली.
A colossal hit! 💥 Smriti Mandhana releases the pressure in style, launching Kim Garth straight over her head for a maximum! 💪🏻🤩#CWC25 Semi-Final 2 👉 #INDvAUS | LIVE NOW ➡ https://t.co/H6FmcwTyRj pic.twitter.com/QbFngMsHKJ — Star Sports (@StarSportsIndia) October 30, 2025
ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.
हेही वाचा : “जेव्हा मी टीम इंडियाचा मुख्य…”, ‘द वॉल’ राहुल द्रविडचे रोहित शर्माबद्दल मोठे विधान; वाचा सविस्तर
भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.






