महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सुनिधी चौहान गाणार(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : IND vs AUS: तिसऱ्या T20I पूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका! ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर; भारतीय संघ करणार आनंद साजरा
आयसीसीकडून एका निवेदनात म्हटले आहे की, “सुनिधी चौहान अंतिम फेरीत सादरीकरण करतील. तिच्यासोबत ६० नर्तकांचा गट असणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक संजय शेट्टी यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. लेसर शो आणि ड्रोन प्रदर्शनांचा देखील समावेश असेल.” सामन्यापूर्वी, सुनिधी चौहान भारतीय राष्ट्रगीत गातील, तर केपटाऊनच्या टेरिन बँक्स दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रगीत सादर करणार आहे.
सुनिधी चौहान याबाबत बोलताना म्हणाली की , “महिला विश्वचषक अंतिम फेरीत सादरीकरण करणे हा एक सन्मान असून मी या खास दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अंतिम फेरीत भारत आणि उत्साही चाहत्यांनी भरलेले स्टँड असल्याने, मला खात्री आहे की वातावरण उत्साहाने भरलेले असणार असून हा दिवस आपल्या सर्वांना दीर्घकाळ लक्षात राहणार आहे.” आपल्या वयाच्या १३ व्या वर्षी गायनाच्या कारकिर्दीला सुरुवात करणारी सुनिधी चौहान ही भारताची सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय गायिका आहे.
अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतीय संघाने अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ३३९ धावांचे विक्रमी लक्ष्य गाठले. टीम इंडियाने यापूर्वी २००५ आणि २०१७ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु, दोन्ही अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
हेही वाचा : IND W vs SA W: अंतिम सामना मोफत पाहायचा? असा करा जुगाड; कधी, कुठे आणि कसा? वाचा सविस्तर
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवून पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. यावेळी, महिला एकदिवसीय विश्वचषक असा संघ जिंकेल ज्याने यापूर्वी कधी देखील ट्रॉफी ऊंचावलेली नाही.






