भारत अ संघाने UAE ला 148 धावांनी लोळवले(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup Rising Stars 2025, India A defeated UAE by 148 runs: आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत भारतीय अ संघाने विजयी सुरवात केली. युएईविरुद्धच्या या सामन्यात भारताने १४८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात वैभव सूर्यवंशी हीरो ठरला, युएई विरुद्ध वैभव सूर्यवंशीने फक्त ३२ चेंडूत शतक झळकवले आहे. त्याच्या शतकाच्या जोरवार भारत अ संघाने ४ बाद २९७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरात युएई संघ २० ओव्हरमध्ये ७ गडी गमावून १४९ धावाच करू शकला. त्यामुळे भारतीय अ संघाने १४८ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताकडून गुर्जपनीत सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
वैभवने आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत सर्वात जलद शतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने या शतकासह एक विशेष कामगिरी केली आहे. वैभव सूर्यवंशी आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा जगातील चौथा खेळाडू बनला आहे. वैभव सूर्यवंशीने प्रथम फक्त १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते, तर पुढील १७ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. वैभव सूर्यवंशी ४२ चेंडूत १४४ धावा काढल्या. यामध्ये त्याने ११ चौकार आणि १५ षटकार मारले.
त्यानंतर त्याने आपली तीच लय कायम ठेवत ३२ चेंडूत आपले शतक देखील पूर्ण केले. वैभव सूर्यवंशी ४२ चेंडूत १४४ धावांवर माघारी परतला. या दरम्यान, वैभवने १४ व्या वर्षी, वैभव या स्पर्धेत शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू देखील बनला आहे. वैभव भारत अ संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाजही ठरला आहे. कर्णधार जितेश शर्माने देखील ३२ चेंडूत स्फोटक ८३ धावांची खेळी साकारली. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ६ षटकार लगावले आहे. वैभव आणि जितेशच्या खेळीमुळे भारतीय संघाने युएई संघासमोर २९८ धावांचे लक्ष्य उभे केले होते.
भारतीय संघाने दिलेल्या २९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईचा डाव १४९ धावाच करू शकला. युएईकडून सोहेब खानने ४१ चेंडूत ६३ धावांची खेळी केली परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सय्यद हैदर २० धावा आणि मुहम्मद अरफान २६ धावांचे योगदान दिले, मात्र हे प्रयत्न अपुरे पडले. भारताकडून गुर्जपनीत सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर हर्ष दुबेने २ विकेट्स घेतल्या. रमणदीप सिंग आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
हेही वाचा : SRH कडून मोहम्मद शमीचा व्यापार! हा स्टार वेगवान ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात; किती कोटी मोजावे लागले?
दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात भारत अ संघाने २० षटकांत ४ विकेट गमावून २९७ धावांचा डोंगर उभा केला आहे.
भारत अ: प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक/कर्णधार), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुर्जपनीत सिंग, सुयश शर्मा
संयुक्त अरब अमिराती : अलिशान शराफू (कर्णधार), सय्यद हैदर (यष्टीरक्षक), सोहेब खान, मयंक राजेश कुमार, हर्षित कौशिक, अयान अफजल खान, अहमद तारिक, मोहम्मद अरफान, मोहम्मद फराजुद्दीन, मोहम्मद रोहिद खान, मोहम्मद जवादुल्ला






