फोटो सौजन्य - BCCI
भारतीय क्रिकेट संघ : भारताचा संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये काल भारताचा श्रीलंके विरुद्ध एक दिवसीय मालिकेमधील दुसरा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला ३२ धावांनी श्रीलंकेने पराभूत केले आहे. या मालिकेचा पहिला सामना ड्रॉ झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामना टीम इंडियाला पराभूत करून श्रीलंकेच्या संघाने आता १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारताच्या संघाला शेवटचा आणि तिसरा सामना जिंकणे महत्वाचे आहे कारण त्या सामन्यामध्ये पराभव झाल्यास श्रीलंका मालिका नावावर करेल.
मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये त्यांनी २४० धावांची लक्ष्य भारतासमोर उभे केले होते. भारताच्या संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीनंतर स्थिती ढासळली. त्यामुळे भारताचे फलंदाज फार मोठी कामगिरी करू शकले नाही त्यामुळे टीम इंडियाला श्रीलंकेने २०८ सर्वबाद झाले.
भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाची सलामी जोडी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात चांगली केली होती. परंतु भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर संघाची फलंदाजी डगमगली आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने ४४ चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या तर शुभमन गिल याने ४४ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या. विराट कोहली फार मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. शिवम दुबे, केएल राहुल हे दोघे शून्यावर आउट झाले. अक्षर पटेलने संघासाठी महत्वाची खेळी खेळली त्याने ४४ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने ४४ चेंडूंमध्ये फक्त १५ धावा केल्या. श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्षदीप सिंह हे खेळाडू संघासाठी फार मोठी धावसंख्या उभी करू शकले नाही.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामधे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दोन्ही संघाची बरोबरी झाली आहे. हा सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे भारताला आता पुढील सामना जिंकले अनिवार्य आहे कारण शेवटचा तिसरा सामना जर श्रीलंकेच्या संघाने जिंकला तर मालिका २-० अशी नावावर करतील.