फोटो सौजन्य – X (BCCI)
India vs England 5th test Match Update : भारताच्या संघ आजपासुन पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेचा हा शेवटचा सामना असणार आहे. भारताच्या संघासाठी या सामन्यात बरोबरी करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. भारताच्या संघाने चौथ्या सामन्यामध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही. अंशुल कंबोज याला भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आले होते पण तो या सामन्यात फार काही चांगली कामगिरी केली नाही. शार्दुल ठाकुरला संघामध्ये स्थान मिळाले होते पण त्याला गोलंदाजीमध्ये फार काही संधी मिळाली नाही.
आता भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचवा सामना खेळणार की नाही यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये फक्त 1 सामना जिंकला आहे. सध्या इंग्लडच्या संघाकडे या मालिकेची आघाडी आहे. त्यामुळे आता मालिकेचा शेवटचा सामन्याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिल याची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्याने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही यासंदर्भात स्पष्ट केले आहे.
भारताच्या कर्णधाराला आज जसप्रीत बुमराह पुढील सामना खेळणार की नाही याबाबत विचारण्यात आले यावर भारताचा कॅप्टनने सांगितले की आम्ही यासंदर्भात अजुनपर्यत चर्चा केलेली नाही. त्यामुळे यावर चर्चा करणे बाकीचे आहे. जसप्रीत बुमराह बद्दला सांगायचे झाले तर जसप्रीत बुमराह हा इंग्लड दौऱ्यावर फक्त 3 सामने खेेळणार असे सांगितले होते. पण आता भारताच्या संघासाठी पाचवा सामना हा महत्वाचा असणार आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह संघासाठी खेळणे गरजेचे मानले जात आहे. बुमराह शेवटचा सामना खेळणार की नाही हे सामने सामन्याच्या काही तासाआधी समजेल.
भारताच्या संघामध्ये दुखापतीचे प्रमाण वाढत चालले आहे. आकाशदीप हा चौथ्या सामन्यामध्ये खेळला नाही, तो चौथ्या सामन्याच्या वेळी जखमी होता. त्याचबरोबर नितिश कुमार रेड्डी देखील मालिकेबाहेर झाला आहे. आता ऋषभ पंत देखील मालिकेबाहेर झाल्यानंतर नव्या खेळाडूची एन्ट्री संघामध्ये झाली आहे. नारायण जगदीसन याला शेवटच्या सामन्यात भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे. तो भारतीय संघासठी शेवटच्या सामन्यामध्ये पदार्पण करणार की नाही यासंदर्भात अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ऋषभ पंत जेव्हा जखमी होता तेव्हा ध्रुव जुरेल याने भारतीय संघासाठी विकेट किपिंग केली होती.
भारताचा संघ हा या मालिकेमध्ये सध्या पिछाडीवर आहे या मालिकेमध्ये भारताच्या संघाला विजय मिळवणे आवश्यक त्यामुळे वृतांच्या माहितीनुसार भारताच्या संघामध्ये अर्शदीप हा पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.