फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
युवराज सिंहची सोशल मीडिया पोस्ट : रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माने तुफानी इनिंग खेळली. त्याची ही खेळी भारतासाठी विजयी ठरली आणि यजमान संघाने इंग्लंडचा १५० धावांनी पराभव केला. या खेळीने अभिषेकने अनेकांची मने जिंकली, त्यात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग, हा अभिषेक शर्माचा प्रशिक्षक होता त्याचे युवराज सिंह बऱ्याचदा व्हिडीओ शेअर केले आहे. भारताचा स्टार आणि सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणार फलंदाज युवराज सिंह यांची भारतीय क्रिकेटमध्ये एक महान खेळाडू म्हणून गणना केली जाते. जेव्हा एखाद्या शिष्य चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याच्या गुरूला सर्वाधिक आनंद होतो हे मात्र खरं.
आता युवराज सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. युवराजने अभिषेकचे कौतुक करत म्हटले की, युवा फलंदाज त्याला जिथे पाहायचे होते तिथे पोहोचला आहे. या सामन्यात अभिषेकने ५४ चेंडूत १३५ धावांची खेळी केली. या डावात या डावखुऱ्या फलंदाजाने सात चौकार आणि १३ षटकार मारले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावा केल्या. इंग्लंडचा संघ अभिषेकने केलेल्या धावांची देखील बरोबरी करू शकला नाही आणि इंग्लिश संघ ९७ धावांवर गडगडला.
Second T20I CENTURY for Abhishek Sharma! 💯
Wankhede has been entertained and HOW! 🤩#TeamIndia inching closer to 150 🔥
Live ▶️ https://t.co/B13UlBNdFP#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vY4rtG0CXb
— BCCI (@BCCI) February 2, 2025
सामना संपल्यानंतर युवराज सिंगने अभिषेकसाठी पोस्ट टाकून त्याचे कौतुक केले. युवराज सिंगने लिहिले, “शानदार खेळी अभिषेक शर्मा. इथेच मला तुला भेटायचे होते. तुझा अभिमान आहे.” सामना संपल्यानंतर अभिषेक स्टार स्पोर्ट्सवर बोलत होता आणि त्यानंतर त्याला या पोस्टबद्दल सांगण्यात आले. यावर अभिषेकने आनंद व्यक्त केला आणि विनोदही केला. अभिषेक म्हणाला, युवी पा ची ही कदाचित पहिली पोस्ट आहे ज्यात त्याने मला शिव्या दिल्या नाहीत किंवा चप्पल मारली नाही असे लिहिले नाही.
अभिषेकने सांगितले की, जेव्हा त्याने युवराज सिंगसोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू त्याला म्हणाला होता की एक दिवस तू भारतासाठी खेळशील आणि सामने जिंकशील. अभिषेक म्हणाला, “तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी युवी पासोबत काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्याने मला मेहनत करत राहण्यास सांगितले. एक दिवस तू भारतासाठी खेळशील आणि सामने जिंकशील.”
Well played @IamAbhiSharma4! That’s where I want to see you! 🔥 Proud of you 👊🏻💯#IndVSEng
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) February 2, 2025
या सामन्यात अभिषेकने १७ चेंडूत अर्धशतक तर ३७ चेंडूत शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय T२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या सामन्यात अभिषेकने रोहित शर्माला मागे टाकले आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला. अभिषेकने देखील दोन विकेट घेतल्या आणि असे केल्याने, त्याच T२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक आणि विकेट घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.