भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
The Indian players will arrive in Nagpur on January 17th : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर या दोन संघात पाच सामन्यांच्या टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २१ जानेवारी रोजी नागपुरात खेळला जाणार आहे. या सामान्यासाठी भारतीय खेळाडू शनिवारी संध्याकाळी नागपुरात येण्यास सुरुवात करणार आहेत. खेळाडूंचे आगमन सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आणि ते रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या शहरांमधून नागपूरला पोहचणार आहे. तर एकदिवसीय मालिकेत सहभागी असलेले उर्वरित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ १८ जानेवारी रोजी इंदूरमध्ये खेळल्यानंतर १९ जानेवारी रोजी नागपुरात दाखल होणार आहेत.
न्यूझीलंडचा संघ देखील याच काळात पोहचणार आहे. शनिवारी संध्याकाळी रवी बिश्नोई दिल्लीहून संध्याकाळी ६:०० वाजता, रिंकू सिंग दिल्लीहून संध्याकाळी ६:१० वाजता, इशान किशन आणि संजू सॅमसन बेंगळुरूहून संध्याकाळी ६:३० वाजता, वरुण चक्रवर्ती हैदराबादहून सकाळी ८:४० वाजता, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल अहमदाबादहून सकाळी ८:५५ वाजता आणि कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे मुंबईहून सकाळी ९:३० वाजता पोहचणार आहेत.
हे खेळाडू विविध विमान कंपन्यांद्वारे नागपूरला पोहचणार आहेत. हे खेळाडू १८ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत जामठा स्टेडियमवर सराव करणार आहेत. दोन्ही संघांचे मुख्य सराव सत्र २० जानेवारी रोजी असेल, ज्यामध्ये न्यूझीलंड संघ दुपारी १:३० ते ४:३० आणि भारतीय संघ सायंकाळी ५:३० ते ८:३० वाजेपर्यंत सराव करणार आहे.
ऑनलाइन तिकिटांची विक्री १७ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होणार आहे. तर सर्वसामान्यांसाठी तिकिटांची विक्री “डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो” मोबाइल अॅप आणि “डिस्ट्रिक्ट.इन” वेबसाइटद्वारे ऑनलाइन सुरू होणार आहे. एका मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचा वापर करून प्रति व्यक्ती जास्तीत जास्त दोन तिकीटांची बुकिंक करू शकतील. ऑनलाइन बुक केलेली तिकिटे १८ ते २० जानेवारी दरम्यान सकाळी ९:३० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत सिव्हिल लाइन्समधील बिलिमोरिया हॉल येथे घेता येतील. जामथा स्टेडियममध्ये कोणतेही रिडेम्पशन काउंटर नसेल.
न्यूझीलंड विरुद्ध भारताचा T20I संघ खालीलप्रमाणे
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (पहिले तीन T20), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, यज्ञदीप सिंग, कुलदीप सिंह, वरुणद्वीप, इंद्रकुमार चतुर्थी. (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.






