फ्लोरिडा : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India, Vs west Indies) यांच्यातील पाच टी-20 मालिकेतील (T20 Series) आज चौथा सामना होणार आहे. पहिला आणि दुसरा टी-20 सामना (WI vs IND 1st T20) वेस्ट इंडिजने जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. त्यामुळं आता 2-1 अशी मालिका आहे. 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील चौथा सामना हा शनिवारी आज (12 ऑगस्ट) रोजी फ्लोरिडा इथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील शेवटचे दोन्ही सामने हे फ्लोरिडातच पार पडणार आहेत. टीम इंडिया आता चौथ्या सामन्यात मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. कारण आज चौथा आणि उद्या पाचवा सलग दोन दिवस सामने खेळविण्यात येणार आहेत. आजच्या निर्णायक सामन्यात भारत बरोबरी साधणार की वेस्ट इंडिज मालिका जिंकणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (india vs west indies fourth t twenty match who will equalize in the fourth match today there will be changes in both teams)
तिलक वर्मावर सर्वाच्या नजरा…
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेत भारताकडून तिलक वर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिलक वर्माने पहिल्या ३ लढतीत त्याने ३९, ५१ आणि नाबाद ४९ अशा धावा केल्या आहे. आता तिलकचे लक्ष्य भारताचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहलीच्या ऐतिहासिक विक्रम मोडण्याकडे आहे. २० वर्षीय तिलक वर्माने आतापर्यंत १३९ धावा केल्या आहेत. आता विराट कोहलीच्या ऐतिहासिक रेकॉर्डकडे त्याची नजर आहे.
सामना कुठे व किती वाजता?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया चौथी टी 20 मॅच सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल इथे खेळवण्यात येईल. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
सामना कसा पाहता येणार?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया चौथा सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल? (wi vs ind 4th t20i live streaming), वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा सामना जिओ सिनेमा एपद्वारे मोबाईलवर पाहता येईल.
संभाव्य भारतीय संघ – हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.
संभाव्य भारतीय संघ – रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.