फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय महिला संघाचा सामना आज वेस्ट इंडिज विरुद्ध रंगणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन T२० सामान्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेचे दोन सामने झाले आहेत. भारताच्या संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळत आहे. भारताच्या संघाने या मालिकेचा पहिला सामना ४९ जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने जिंकला आणि मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी केली आहे. आज मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना रंगणार आहे. आजचा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजचा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांना तिसरा T२० सामना जिंकून मालिका जिंकायची आहे.
R Ashwin : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास तयार नव्हता अश्विन? बीसीसीआयसमोर ठेवली अट
आजचा सामना नवी मुंबईमधील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. डीवाय पाटील स्टेडियम खेळपट्टीवर या आधी झालेल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने १९५ धावांची मोठी मजल मारली होती. यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने १५९ धावांची मजल सहज गाठली. या मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपे जाते, असे मानले जाते. त्यामुळे दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करू शकतात. आजच्या खेळपट्टीवर या मालिकेचा त्याचबरोबर सामन्याचा देखील निकाल लागणार आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणारा आजचा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. या सामान्यांच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होणार आहे. चाहते Jio सिनेमावर मोफत लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक स्पोर्ट्स-18 वर थेट या सामन्याचे प्रक्षेपण पाहू शकतात.
One final hurdle stands in the way! 💪
Can #TeamIndia clinch the series tonight? 🤔 Watch the 3rd #INDvWI T20I, LIVE on #JioCinema & #Sports18 👈#JioCinemaSports pic.twitter.com/YbIebTE0Vo
— JioCinema (@JioCinema) December 19, 2024
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकिपर), उमा छेत्री, दीप्ती शर्मा, सजीवन सज्जना, राधा यादव, सायमा ठाकोर, तीतस साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.
हेली मॅथ्यू (कर्णधार), कियाना जोसेफ, डिआंड्रा डॉटिन, शमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), शबिका गझनबी, चिनेल हेन्री, करिश्मा रामहार्क, शमिलिया कोनेल, एफी फ्लेचर, जाडा जेम्स आणि मँडी मंगरू.
भारताच्या संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध T२० मालिका सुरु आहे, त्यानंतर २२ डिसेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे.