सिडनी टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर WTC फायनलमध्ये पोहचणार का टीम इंडिया, काय असेल समीकरण, जाणून घ्या सविस्तर
India WTC Final Qualification Scenario After Sydney Test : मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या पराभवामुळे डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता टीम इंडियाला 3 जानेवारीपासून सिडनीमध्ये मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळायचा आहे. WTC फायनलच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला सिडनी टेस्ट कोणत्याही किमतीवर जिंकावीच लागेल. पण हा कसोटी सामना अनिर्णित राहिला तर… अनिर्णित राहिल्यानंतर समीकरण काय असेल? हेच आपण जाणून घेणार आहोत.
WTC फायनलच्या भारतीय संघाच्या आशा जवळजवळ संपुष्टात
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये शेवटचा आणि अंतिम सामना जर अनिर्णित राहिला तर WTC फायनलच्या भारतीय संघाच्या आशा जवळजवळ संपुष्टात येणार आहेत. त्यानंतर जिंकल्यानंतरसुद्धा टीम इंडियाचे काय होणार हेसुद्धा वेगळे गणित आहे. आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की, जर सिडनी कसोटी अनिर्णित राहिली तर टीम इंडियाची WTC फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता किती असेल.
सिडनी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकावी लागेल
WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी, भारतीय संघाला सिडनी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकावी लागेल. हा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी कसोटी हरेल किंवा ड्रॉ करेल, या दोन्ही बाबतीत टीम इंडियाचा प्रवास संपणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत सिडनी कसोटी जिंकावीच लागणार आहे. जिंकले तरीही भारतीय संघाला या गोष्टी पार करावी लागणा आहे.
भारताने सिडनी कसोटी जिंकली तर काय समीकरण
सिडनीत खेळवण्यात येणारा पाचवा कसोटी सामना भारताने जिंकला तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेवर लक्ष ठेवावे लागेल. म्हणजे केवळ सिडनी कसोटी जिंकणे पुरेसे ठरणार नाही. प्रथम, भारताने सिडनी कसोटी जिंकली पाहिजे आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेने 2-0 किंवा 1-0 असा विजय मिळवावा, अशी प्रार्थना करावी. जर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत एकही कसोटी सामना जिंकला तर ते पात्र ठरेल आणि टीम इंडिया बाहेर होईल. जर ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्धची पाचवी कसोटी जिंकली तर तो लगेचच अंतिम फेरीत पोहोचेल.