पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय (फोटो -ट्विटर)
INDIA Vs ENGLAND: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पहिला एकदिवसीय सामना पार पडला. पहिला सामना हा नागपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करून इंग्लंडने भारताला 249 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने हे लक्ष्य 6 विकेट गमावून केवळ 39 ओव्हर्समध्येच पूर्ण केले.
भारताची फलंदाजी सुरू झाली आणि रोहित शर्मा लगेचच बाद झाला. या सामन्यात त्याला सूर गवसतो का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र टो केवळ 2 धावा करून बाद झाला. तर सलामीवर यशस्वी जयस्वाल देखील लगेच बाद झाला. एकामागोमाग 2 विकेट गेल्याने भारताचा संघ दडपणाखाली आला. मात्र त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने भारताचा डाव पुढे नेला. तर दुसऱ्या बाजूला शुभमन गिलने देखील बाजू सावरून धरली होती.
श्रेयस अय्यरने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 36 चेंडूत 59 धावा केल्या. भारताची धावसंख्या 113 असताना अय्यर बाद झाला. मात्र संघाने अक्षर पटेलला वर खेळण्यास पाठवले. त्या संधीचे सोने अक्षरने केले. अक्षर पटेलने 47 चेंडूत 52 धावा करून भारताला सावरले. त्यानंतर मैदानात खेळायला आलेला केएल राहुल खास खेळी करू शकला नाही. शुभमन गिलने तडाखेबंद खेळी केली. शुभमन गिलने 96 चेंडूत 87 धावा केल्या. हार्दिक पंड्याने दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकला.
1ST ODI. India Won by 4 Wicket(s) https://t.co/B13UlBNLvn #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 6, 2025
इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. दुखापत झाल्याने या सामन्यात विराट कोहली खेळत नाहीये. इंग्लंडकडून फिलिप सॉट आणि बेन डकेट यांनी 75 धावांची चांगली भागीदारी करून दिली. पहिलाच सामना खेळत असलेला हर्षित राणाने आज कमाल गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या. हर्षित राणाने 7 ओव्हर्स टाकल्या. त्यातील एक ओव्हर त्याने मेडन टाकली. 53 धावा देत त्याने 3 बळी टिपले.
फिरकीपटू रवींद्र जाडेजाने देखील जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत. मोहम्मद शमी, अक्षर पटेल यांनी देखील चांगली गोलंदाजी केली.
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताची प्लेइंग ११ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, के. एल. राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, हर्षित राणा, कुलदीप यादव.
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग ११ :
फिल्ल सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, ब्रायडॉन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद