विराट कोहली-रोहित शर्मा(फोटो-सोशल मिडिया)
Most ODI runs in the year 2025 : भारतीय संघाचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगलाच दबदबा बघायला मिळत आहे. २०२५ मध्ये भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक महत्वाचे टप्पे पार केले. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे भारताने जवळजवळ १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदावर नाव कोरले. तसेच अनेक मालिका विजय देखील मिळवले. या वर्षी भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज खेळाडूंनी धावांचा रतीब घातला आहे. तर इतर खेळाडूंनी देखील या वर्षी भारतासाठी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : Commonwealth Games 2030 : ‘भारत सरकारचे खेळांवर लक्ष…’ FIH चे अध्यक्ष तय्यब इकराम यांचे प्रतिपादन
भारताने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्षातील शेवटची एकदिवसीय स्पर्धा खेळली गेली. भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत ही मालिका जिंकली. या वर्षातील भारतीय संघाची ही शेवटची मालिका होती. त्यामूळे आता या वर्षी भारतासाठी कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा काढल्या आहेत.
या वर्षी भारतीय संघासाठी विराट कोहली सर्वात लाभदायी फलंदाज ठरला आहे. त्याने १३ एकदिवसीय सामने खेळले आणि १३ डावांमध्ये ६५.१० च्या सरासरीने ६५१ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने ३ शतके आणि ४ अर्धशतके ठोकली आहेत. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने अनेक विजय देखील मिळवले आहेत.
भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०२५ या वर्षात रोहित शर्माने दुसऱ्या क्रमांकाच्या धावा काढल्या आहेत. रोहितने १४ डावांमध्ये ५०.०० च्या सरासरीने ६५० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने २ शतके आणि ४ अर्धशतके ठोकली आहेत. रोहित शर्माकया आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने अनेक मोठ-मोठे विजय मिळवले आहेत.
धावांच्याबाबतीत श्रेयस अय्यर या यादीत तिसऱ्या स्थानी येतो. श्रेयस अय्यरने या वर्षी ११ सामन्यांमध्ये १० डावांमध्ये ४९.६० च्या सरासरीने एकूण ४९६ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने पाच अर्धशतके लागावळी आहेत. अय्यरने अनेक सामन्यांमध्ये संघाला संकटातून बाहेर काढले आहेत. अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता बनवण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने देखीलक २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याला २०२५ मध्ये कसोटी कर्णधारपद दिल्यानंतर त्याच्याकडे एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले होते. गिलने या वर्षी ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९.०० च्या सरासरीने एकूण ४९० धावा काढल्या आहेत. यामध्ये त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत.
विकेटकीपर-फलंदाज केएल राहुलचाही २०२५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत समावेश आहे. या यादीत केएलचे नाव पाचव्या क्रमांकावर येते. केएल राहुलने १४ सामन्यांमध्ये ११ डावांमध्ये ५२.४२ च्या सरासरीने ३६७ धावा काढल्या आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतके लागावली आहेत. अनेक वेळा संघाच्या मजबूत स्थितीत योगदान दिले.






