फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महिला T20 विश्वचषक 2024 ची सध्या रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. भारताच्या संघाचे आतापर्यत तीन सामने झाले आहेत. यामध्ये त्यांनी दोन सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाने न्यूझीलंड विरुद्ध झालेला विश्वचषकातील पहिला सामना गमावला आहे. भारताच्या संघाचा आज साखळी सामन्याचा शेवटचा सामना रंगणार आहे. त्यामुळे आजचा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने विजय संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. परंतु आजचे आव्हान भारतासाठी सोपे असणार आहे. आज भारतासमोर महिला T20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेमध्येएकही सामना न गमावलेला संघ उभा असणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाची महिला T20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर संघाने आतापर्यत तीन सामने खेळले आहेत. या तीनही सामन्यांमध्ये त्यांनी एकही सामना गमावला नाही. त्याचबरोबर सध्या ग्रुप A मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारताचा संघ सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु भारताच्या संघाला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. हा सामना जिंकल्यास भारताचा संघाला उपांत्य फेरीमध्ये जाण्याच्या संधी वाढतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांदरम्यान खेळला जाणारा हा सामना तुम्हाला कधी, कुठे आणि कसा पाहता येईल.
महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
T20 विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये खेळला जाणारा सामना आज, रविवारी, 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल, तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.
T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये खेळला जाणारा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल.
महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल.