फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
अनोखे रेकॉर्ड : क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे अनेक दिग्गज आहेत ज्यांनी अनेक धावा केल्या आहेत आणि त्यांची नावे क्रिकेटच्या इतिहासामध्ये नोंदवण्यात आली आहे. भारताच्या माजी खेळाडू आहे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. त्याचे असे अनेक रेकॉर्ड आहेत जे मोडणं फार कठीण आहे. ब्रायन लाराचा 400 नाबाद धावा, मुथय्या मुरलीधरनचा 800 बळी आणि सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक 15921 कसोटी धावांचा विक्रम मोडणे कठीण आहे.
भारताकडून आतापर्यंत वीरेंद्र सेहवाग आणि करुण नायर यांनी कसोटीत त्रिशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर करुण नायर याला त्याच्या या तिहेरी शतकामुळे त्याची अजूनही विशेष ओळख क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे. सेहवागने असे दोनदा केले आहे. दुसरीकडे, डझनभर खेळाडूंनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. आम्ही तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक झळकावणाऱ्या फलंदाजाबद्दल सांगत आहोत.
IND vs AUS 3rd Test : ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीची पावसाने केली मजा खराब, भारताचा फलंदाजी कोलमडली
या वर्षी जानेवारीमध्ये हैदराबादचा फलंदाज तन्मय अग्रवालने मॅरेथॉन इनिंग खेळली होती. अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्याने ३६६ धावांची इनिंग खेळली होती. तन्मयने अवघ्या 147 चेंडूत त्रिशतक झळकावले होते. तो केवळ भारताचाच नाही तर जगातील प्रथम श्रेणीतील सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा खेळाडू आहे. त्यानंतर त्याने मार्को मराइसला मागे सोडले. 2017 मध्ये, त्याने पूर्व प्रांताविरुद्ध बॉर्डर संघासाठी 191 चेंडूत त्रिशतक झळकावले.
Magnificent! 🤯
Hyderabad’s Tanmay Agarwal has hit the fastest triple century in First-Class cricket, off 147 balls, against Arunachal Pradesh in the @IDFCFIRSTBank #RanjiTrophy match 👌
He’s unbeaten on 323*(160), with 33 fours & 21 sixes in his marathon knock so far 🙌 pic.twitter.com/KhfohK6Oc8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 26, 2024
तन्मयने भारतासाठी प्रथम श्रेणीमध्ये एका दिवसात सर्वाधिक धावा करण्याचा वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला होता. 2009 मध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेहवागने 284 धावा केल्या होत्या. फर्स्ट क्लासमध्ये एका दिवसात 300 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तन्मय हा भारताचा पहिला खेळाडू आहे.
तन्मयने अरुणाचलविरुद्ध 181 चेंडूंचा सामना केला होता. या कालावधीत 34 चौकार आणि 26 षटकारांच्या मदतीने 366 धावा केल्या. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 202.20 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याच्याशिवाय तत्कालीन कर्णधार राहुल सिंगने 105 चेंडूत 185 धावा केल्या होत्या. अरुणाचल संघ पहिल्या डावात 172 धावांवर बाद झाला. यानंतर हैदराबादने आपला पहिला डाव 615/4 धावांवर घोषित केला. यानंतर अरुणाचल संघ दुसऱ्या डावात 256 धावांत गारद झाला. हैदराबादने हा सामना एक डाव आणि 187 धावांनी जिंकला होता.