भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा नेहमी चर्चेत असतो. त्याने वर्ल्डकपमध्ये (World Cup) केलेल्या कामगिरीमुळे चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. अर्जुन पुरस्काराने (Arjun Award) गौरवण्यात आलेल्या मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा रंगलेली असते. त्याच्या बायकोने त्याच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ निर्माण झाली होती. आता मात्र पुन्हा एकदा मोहम्मद शमीच्या लग्नाची (Mohammed Shami wedding) चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर शमीचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे.
भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याचा पत्नी हसीन जहाँपासून पहिला घटस्फोट झाल्यानंतर अनेक तिने आरोप केले होते. मात्र आता पुन्हा एकदा शमी बोहल्यावर चढणार असल्याचे बोलले जात आहे. मोहम्मद शमी हा सोशल मीडियावर आपल्या लाईफ अपडेट शेअर करत असतो. सध्या त्याने एका लूकमधील फोटो शेअर केला. यामध्ये तो नवरदेवासारखा तयार झाला आहे. गळ्यामध्ये हार आणि डोक्यावर फेटा असा शमीने लूक केला असून यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत लग्न केले का असा सवाल केला आहे.
मोहम्मद शमीच्या या फोटोवर कमेंट्स करत चाहते त्याला शुभेच्छा देखील देत आहेत. एका वापरकर्त्याने विचारले,“शमी भाई, तू पुन्हा लग्न करणार आहेस का?” तर दुसर्या युजरने लिहिले, “तुम्ही अलादीन, भाईसारखे दिसत आहात.” मात्र फोटो पाहून असे वाटते की शमी कोणत्या तरी खास ठिकाणी गेला असून त्याचे असे खास स्वागत करण्यात आले आहे.