फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
IPL 2025 points table : आयपीएल २०२५ मध्ये काल गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. गुजरातने हा सामना ५८ धावांनी जिंकला आणि या स्पर्धेचा चौथा विजय नववा केला आहे. तर राजस्थान रॉयल्सच्या संघाची सुरुवात या स्पर्धेमध्ये फार चांगली राहिली नाही पण त्यांनी मागील दोन सामन्यांमध्ये त्यानी विजय मिळवून या स्पर्धेमध्ये कमबॅक केला होता पण गुजरात टायटन्सच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल २०२५ चे पाच वेळा जेतेपद जिंकणारे संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकले नाही स्पर्धेच्या २३ सामन्यानंतर पॉईंट टेबलची स्थिती काय आहे यावर एकदा नजर टाका.
आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेवर नजर टाकली तर दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ या सीझनमध्ये दमदार फॉर्ममध्ये आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्सने पहिले स्थान पटकावले आहे. गुजरातने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत, त्यापैकी ४ सामने जिंकले आहेत. याशिवाय, दिल्ली कॅपिटल्स संघ ३ सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे आणि आरसीबी संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, ३ विजेत्या संघांची स्थिती आता बिकट होताना दिसत आहे.
Feels so good 😎 pic.twitter.com/6XPAdfcip2
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 9, 2025
या स्पर्धेमध्ये पॉईंट टेबलवर चौथ्या स्थानावर पंजाब किंग्सचा संघ आहे, पंजाबचे आतापर्यत ४ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि १ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाचव्या स्थानावर सहा गुणांसह लखनौ सुपर जायंट्सचा संघ आहे. लखनौने ५ समाने खेळले आहेत यामध्ये त्यांनी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचा संघ अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहे.
हो, आपण चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद सारख्या चॅम्पियन संघांबद्दल बोलत आहोत. ज्यांच्यासाठी प्लेऑफचा मार्ग अजिबात सोपा असणार नाही. या तिन्ही संघांवर बाद होण्याचा धोकाही टांगती तलवार आहे. या तिन्ही संघांनी ५-५-५ सामने खेळले आहेत आणि तिन्ही संघांनी ४-४-४ असे सामने गमावले आहेत. हैदराबादचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. या तीनही संघानी या स्पर्धेमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. हैदराबादचा संघ कागदावर अत्यंत मजबूत दिसत होता पण संघाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली आहे.