विजय माल्ल्याने दिला खास संदेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/Social Media)
RCB Vs GT Qualifier 1: रन्सचा पाऊस की पाण्याचा जोर? बंगळुरू अन् गुजरात सामन्यावर पाऊस पाणी फिरवणार?
विजय मल्ल्याने पाठवल्या शुभेच्छा
Best of Luck RCB namma dodda Simhagulu. This is a great chance for our Lions of Bengaluru to go straight to the IPL Final. Play Bold and roar loud. God Bless you. — Vijay Mallya (@TheVijayMallya) May 26, 2026
२००८ मध्ये आरसीबी फ्रँचायझीची स्थापना करणाऱ्या विजय मल्ल्या यांनी क्वालिफायर १ च्या आधी संघाला शुभेच्छा पाठवल्या आहेत. भारतातून पळून लंडनमध्ये लपून बसलेल्या मल्ल्या यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “आरसीबीच्या आमच्या मोठ्या सिंहांना खूप खूप शुभेच्छा. बंगळूरच्या आमच्या सिंहांसाठी थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही एक मोठी संधी आहे. निर्भयपणे खेळा आणि मोठ्याने गर्जना करा. देव तुमचे भले करो.”
धर्मशाळा येथे नाणेफेक जिंकणे निर्णायक ठरेल
पहिल्या क्वालिफायरमध्ये नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. आयपीएल २०२६ मध्ये धर्मशाला मैदानावर तीन सामने खेळले गेले आहेत. यापैकी दोन सामने रात्री खेळले गेले आणि दोन्ही सामन्यांमध्ये, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला. रात्र झाल्यावर फलंदाजी करणे सोपे होते. त्यामुळे, पहिल्या क्वालिफायरमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. हा सामना जास्त धावांचा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये येथे १७ सामने खेळले गेले आहेत आणि पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९२ धावा आहे.
RCB: आता लक्ष्य फक्त फायनलचं! RCB इतिहासाची पुनरावृत्ती करणार? प्लेऑफमधील आकडेवारी काय सांगते?
क्वालिफायर १ मधील RCB विरुद्ध GT सामन्याची धावसंख्या
आरसीबीची पहिल्या क्वालिफायरमध्ये उत्कृष्ट कामगिरी आहे. या संघाने आयपीएलमध्ये तीन वेळा पहिला क्वालिफायर खेळला असून, त्यात दोन विजय आणि एक पराभव आहे. २०११ मध्ये हा संघ सीएसकेकडून हरला होता, परंतु २०१६ मध्ये गुजरात जायंट्स आणि २०२५ मध्ये पंजाब किंग्सला पराभूत केले. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने दोनदा पहिला क्वालिफायर खेळला आहे. २०२२ मध्ये, त्यांच्या पदार्पणाच्या हंगामात, गुजरातने पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थानचा पराभव केला. २०२३ मध्ये, त्यांना सीएसकेकडून पराभव पत्करावा लागला.






