गुजरात विरुद्ध बंगलोर सामन्यावर पावसाचे सावट (फोटो- istockphoto)
आज आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स भिडणार
क्वालिफायर 1 सामन्यावर पावसाचे सावट
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
Tata IPL 2026 GT Vs RCB Qualifier 1: आयपीएलचा थरार शेवटच्या आठवड्यात येऊन पोहोचवला आहे. आजपासून आयपीएलचे प्ले ऑफचे सामने सुरू झाले आहेत. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये क्वालिफायर 1 होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार आहेत. मात्र (IPL 2026) आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. तसे झाल्यास नेमके कोण फायनलमध्ये जाणार हे जाणून घेऊयात.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 मध्ये भिडणार आहेत. टॉप 2 मध्ये असणार हे संघ आज आमनेसामने आले आहेत. आज जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीत दाखल होणार आहे. तसेच पराभूत झालेल्या संघाला एलिमिनेटरमध्ये जिंकणाऱ्या संघाशी खेळावे लागणार आहे. मात्र आजच्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यास काय होईल ते पाहुयात.
आजचा सामना धर्मशाळा येथे होणार आहे. आजच्या सामन्याआधी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहिला तर हा सामना रद्द होऊ शकतो. अंतिम सामना सोडून कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नसतो. त्यामुळे सामना रद्द झाल्यास रनरेट जास्त असणारा संघ अंतिम फेरीत जाऊ शकतो.
RCB: आता लक्ष्य फक्त फायनलचं! RCB इतिहासाची पुनरावृत्ती करणार? प्लेऑफमधील आकडेवारी काय सांगते?
सकाळी 10 ते 6 ते 7 पर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या वेळेत 50 टक्केपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सलग पाऊस झाल्यास मैदान ओले होऊ शकते. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. किंवा ओव्हर्स कमी होऊ शकतात, तसेच सामना रद्द देखील होऊ शकतो.
वेगवान गोलंदाजांसाठी उत्तम
समुद्रसपाटीपासून अंदाजे १४५० मीटर उंचीवर असलेले हे मैदान, भारतातील अशा काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूने सातत्यपूर्ण स्विंग आणि अतिरिक्त उसळी मिळते. डोंगराळ प्रदेशातील थंड आणि मंद वाऱ्यामुळे गोलंदाजांना प्रभावीपणे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यास मदत होते. इतर मैदानांप्रमाणे, येथे वेगवान गोलंदाजांना मिळणारी मदत म्हणजे सामना कमी धावसंख्येचा होईलच असे नाही.
आरसीबी: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार.
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा.






