RR Vs SRH Live Streaming (फोटो- ट्विटर)
वैभव सूर्यवंशीची 28 बॉलमध्ये 97 रन्सची खेळी
राजस्थान रॉयल्स अन् एसआरएचमध्ये सुरूये एलिमिनेटर सामना
जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये गुजरातला भिडणार
Tata IPL 2026 SRH vs RR Eliminator Live Updates: न्यू चंदीगडच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स अन् सनरायझर्स हैदराबादमध्ये एलिमिनेटर सामना सुरू आहे. एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान राजस्थान रॉयल्सने शानदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळी केली. आता क्वालिफायर 2 मध्ये गुजरातविरुद्ध खेळण्यासाठी एसआरएचला 244 रन्सची गरज असणार आहे.
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सकडून खेळण्यासाठी यशवी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने डावाची सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने वेगवान अर्धशतक लगावले. 15 बॉलमध्ये अर्धशतक केले. वैभवने एक मार्गी एसआरएचच्या गोलंदाजांची धुलाई केली. तो 28 बॉलमध्ये 97 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी ध्रुव जुरेल आला. यशवी जयस्वाल 29 रन्स करून आउट झाला. ध्रुव जुरेल 50 रन्स करून आउट झाला. रियान परागने 12 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. डोनोवेल फरेरा 12 रन्सवर आउट झाला.
6⃣th FIFTY of the season 👌 Dhruv Jurel goes back after a sparkling knock ✨ Updates ▶️ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/yXxXL0QiXP — IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026
एसआरएचची गोलंदाजी
एसआरएचच्या गोलंदाजांना आज राजस्थानच्या सलामीच्या फलंदाजांनी घाम फोडला. 8 ओव्हर्सपर्यंत एकही विकेट त्यांना घेत आली नाही. अखेर 9 व्या ओव्हरमध्ये प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीला लगाम लावला. शिवांग कुमारने यशस्वी जयस्वालला आउट केले. प्रफुल हिंगेने ध्रुव जुरेलची विकेट घेतली.
SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…
हैदराबादची प्लेइंग इलेव्हन:अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल/प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन.
राजस्थानची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), दासुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा/रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.






