RR Vs SRH Live Streaming (फोटो- ट्विटर)
राजस्थान रॉयल्सचे एसआरएचला 244 रन्सचे टार्गेट
अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलवर झाला आउट
इशान किशन 45 रन्सची आक्रमक खेळी करून परतला
Tata IPL 2026 SRH vs RR Eliminator Live Updates: आज चंदीगडच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेलच्या खेळीच्या जोरावर एसआरएचला 244 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने एसआरएचचा 47 रन्सने पराभव केला आहे. राजस्थानच्या संघाने आता क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. 29 तारखेला राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर 2 चा सामना चंदीगडमध्ये खेळणार आहे.
एसआरएचची फलंदाजी
राजस्थानने दिलेल्या 244 रन्सचा पाठलाग करण्यासाठी एसआरएचकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने सुरुवात केली. मात्र अभिषेक शर्मा आपले खातेही उघडू शकला नाही. तो पहिल्याच बॉलवर आउट झाला. त्यामुळे एसआरएचला मोठा धक्का बसला. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या इशान किशनने 45 रन्सची आक्रमक खेळी केली. 45 रन्स करून तो आउट झाला. तर पाठोपाठ आर स्मरण 1 रन करून परतला. नितीश कुमार रेड्डीने झुंज दिली. मात्र तो 38 रन्स करून आउट झाला. सलिल अरोरा 35 रन्स करून आउट झाला.
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्ले मध्येच एसआरएचच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. जोफ्रा आर्चरने पहिल्याच बॉलवर अभिषेक शर्माला आउट केले. त्यापाठोपाठ त्याने ट्रेविस हेडला आणि इशान किशनला आउट केले. नांद्रे बर्गरने स्मरणला आउट केले. रवींद्र जाडेजाने रेड्डीची विकेट पटकवली. जाडेजाने सलिल अरोराला आउट केले.
RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सकडून खेळण्यासाठी यशवी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने डावाची सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने वेगवान अर्धशतक लगावले. 15 बॉलमध्ये अर्धशतक केले. वैभवने एक मार्गी एसआरएचच्या गोलंदाजांची धुलाई केली. तो 28 बॉलमध्ये 97 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी ध्रुव जुरेल आला. यशवी जयस्वाल 29 रन्स करून आउट झाला. ध्रुव जुरेल 50 रन्स करून आउट झाला. रियान परागने 12 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. डोनोवेल फरेरा 12 रन्सवर आउट झाला.
In the 𝘼𝙍𝘾her 🏹 Updates ▶️ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/kbTsSgayj0 — IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026
एसआरएचची गोलंदाजी
एसआरएचच्या गोलंदाजांना आज राजस्थानच्या सलामीच्या फलंदाजांनी घाम फोडला. 8 ओव्हर्सपर्यंत एकही विकेट त्यांना घेत आली नाही. अखेर 9 व्या ओव्हरमध्ये प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीला लगाम लावला. शिवांग कुमारने यशस्वी जयस्वालला आउट केले. प्रफुल हिंगेने ध्रुव जुरेलची विकेट घेतली.
हैदराबादची प्लेइंग इलेव्हन:अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल/प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन.
SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…
राजस्थानची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), दासुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा/रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.






