US Strike Iran : दोन दिवसांत अमेरिकेचा दुसरा हल्ला; भीषण स्फोटांनी हादरले इराणचे अब्बास बंदर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेन सैन्याने इराणचे चार ड्रोन हवेतच हाणून पाडले आहेत. बंदर अब्बासमधील ग्राउंड स्टेशनवर हल्ला झाला आहे. अमेरिकेने स्वसंरक्षणात्मक हल्ल्याचा हवाला दिला आहे. अमेरिकन सैन्याला या तळांपासून थेट धोका होता असे सेंट्रल कमांडच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी २६ मे रोजी देखील अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी इराणच्या होर्मुझमध्ये माइन्स गाडणाऱ्या दोन जहाजांवर आणि अब्बास बंदरावरील क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रावर हल्ला केला होता. त्यावेळी देखील सैनिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यात आली होती असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले होते.
पहिल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवादादरम्यान डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी, इराणच्या अटी अमेरिकेला मान्य नसल्याचे म्हटले होते. त्यांनी इराणला इशारा दिला होता की, इराणने अमेरिकेच्या सर्व अटी मान्य न केल्यास त्यांच्यावर थेट लष्करी कारवाई केली जाईल. तसेच होर्मुझवर इराण (Iran) आणि ओमानच्या नियंत्रण खपवून घेतले जाणार नाही हेही स्पष्ट केले होते.
दुसरीकडे इराणने युद्धा पुन्हा भडकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांमुळे इराण त्रस्त झाला असून याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. अमेरिकेने हल्ले थांबवले नाहीत तर इस्रायलला संपवण्याचा इशाराही इराणने दिला आहे. इराणने अमेरिकेच्या कारवाईला युद्धबंदीचे उल्लंघन संबोधले आहे.
दुसरीकडे इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरुच आहेत. २६ मे रोजी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये भीषण प्रहार केला होता. ज्यामध्ये हिजबुल्लाचे मुख्य नियंत्रण असलेल्या १० कमांड सेंटर्सना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात हिजबुल्ल्हाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
सध्या ही परिस्थिती अमेरिका (America) इराण शांतता चर्चेत अडथळा ठरत आहे. अमेरिकेचा अब्बास बंदरावरील हल्ला आणि इस्रायलचा लेबनॉनमध्ये कहर यामुळे युद्ध पुन्हा पेटण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Ans: अमेरिकेने स्वसंरक्षणात्मक हल्ल्याचा हवाला देत इराणच्या अब्बास बंदरावर ग्रांउड स्टेशनवर हल्ला केल्याचे म्हटले.
Ans: ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेच्या सर्व अटी मान्य करण्याचा इशारा दिला आहे. अटी मान्य न झाल्यास त्यांच्यावर थेट लष्करी कारवाईचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
Ans: २६ मे रोजी झालेल्या हल्ल्यावर इराणने संतप्त भूमिका घेत, याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे.






