जेपी ड्युमिनीने वेगळे झाल्याचे केले जाहीर (फोटो सौजन्य - Instagram)
शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि युझवेंद्र चहल यांच्यानंतर आता आणखी एका क्रिकेटपटूच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. हा दिग्गज क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू जीन पॉल ड्युमिनी आहे. ४० वर्षीय माजी क्रिकेटपटू आणि त्यांची पत्नी सू यांनी सोमवारी (१७ फेब्रुवारी २०२५) एक निवेदन जारी करून त्यांच्या विभक्ततेची घोषणा केली आहे.
IPL मध्ये मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्या दिल्ली कॅपिटल्स) यांचे नेतृत्व करणाऱ्या जेपी ड्युमिनीने इंस्टाग्रामवर आपले विचार शेअर केले आणि लिहिले की, ‘बऱ्याच विचारविनिमयानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.’ असे सांगितले आहे.
ड्युमिनीची पोस्ट
ड्युमिनीने केल्या भावना व्यक्त
आपल्या भावना व्यक्त करताना ड्युमिनीने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘आम्ही आमच्या वैवाहिक जीवनात अनेक संस्मरणीय क्षण एकत्र घालवल्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो. एकत्र राहत असताना, आम्हाला दोन सुंदर मुलींचा आशीर्वाद मिळाला. आपण सध्या काही बदलाच्या काळातून जात आहोत. आमचे मार्ग वेगळे होत असले तरी आम्ही मित्र राहू आणि हा निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आला आहे.’ असं म्हणत त्याने वेगळे झाल्याचे जाहीर केले आहे.
Sana Mir Statement : ‘MS धोनी कर्णधार बनला तरीही….’; माजी कर्णधाराचे पाकिस्तान टीमवर खळबळजनक वक्तव्य
चाहत्यांचे मानले आभार
आफ्रिकन क्रिकेटपटूने शेवटी लिहिले, ‘तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आणि समजुतीबद्दल धन्यवाद. खूप खूप प्रेम – जेपी आणि स्यू. आम्ही तुम्हाला सांगतो की डुमनी आणि सू यांचे लग्न २०११ मध्ये झाले होते. ‘यू’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सू म्हणाली होती, ‘आमचे लग्न ही आमची पहिली प्राथमिकता आहे. जर काही समस्या उद्भवली तर आम्ही ती लवकर सोडवतो. २०२३ च्या सुरुवातीला तिने म्हटले होते, ‘मी जे काही करते ते. ते जेपीला मदत करण्यासाठी आहे. जेव्हा मी त्याला यशस्वी आणि आनंदी होताना पाहते तेव्हा मला खूप आनंद आणि समाधान वाटते. मात्र आता दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत.
ड्युमिनीपूर्वी या क्रिकेटपटूंचा घटस्फोट
क्रिकेट जगतातील अनेक महान खेळाडूंचा घटस्फोट झाला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. त्यांची पत्नी नताशा स्टॅनकोविक आता वेगळी राहते. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या बातम्याही आल्या. मात्र, दोघांनीही अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि शिखर धवन यांचाही घटस्फोट झाला आहे.
ड्युमिनी आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळला
जेपी ड्युमिनीची क्रिकेट कारकीर्द शानदार राहिली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी १९९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने ५११७ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये ड्युमिनीने ४ शतके आणि २७ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये ६९ विकेट्सही घेतल्या आहेत. ड्युमिनी आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळला आहे. या स्पर्धेतील ८३ सामन्यांमध्ये त्याने २०२९ धावा केल्या आहेत. या काळात २३ विकेट्स घेतल्या आहेत.
उपांत्य फेरीत भारतीय संघाची कोणाशी होणार लढत? जाणून घ्या चॅम्पियन ट्रॉफीचे समीकरण