फोटो सौजन्य: Pinterest
Bajaj NS400Z मध्ये 349.13cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जुन्या 373cc इंजिनची जागा घेते. हे इंजिन 9,000 rpm वर 40 hp पॉवर आणि 7,500 rpm वर 33.2 Nm टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, KTM 390 Duke मध्ये 350cc इंजिन देण्यात आले आहे, जे 41.5 hp पॉवर आणि 33.5 Nm टॉर्क जनरेट करते. परफॉर्मन्सच्या बाबतीत KTM थोडीशी आघाडीवर दिसते.
Tesla कडून भारतात Model Y चा नवा व्हेरिएंट लाँच, मिळणार 661 किमीची रेंज आणि बरंच काही
Bajaj NS400Z मध्ये रायडरसाठी आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये Road, Rain, Sport आणि Offroad असे विविध ABS राइड मोड्स तसेच इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोलचा समावेश आहे. KTM 390 Duke मध्ये 5-इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, विविध राइड मोड्स, ट्रॅक स्क्रीन, लॉन्च कंट्रोल आणि कॉर्नरिंग ABS मिळते. याशिवाय KTM मध्ये राइड-बाय-वायर, क्विकशिफ्टर+, सुपरमोटो ABS आणि Type-C चार्जिंग पोर्टसारखी अतिरिक्त फीचर्सही आहेत.
Bajaj NS400Z मध्ये 43 mm USD फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूस 6-स्टेप अॅडजस्टेबल नायट्रॉक्स मोनोशॉक दिला आहे, जो विविध रस्त्यांवर आरामदायी राइड देतो. यामध्ये 17-इंच ट्यूबलेस टायर्स (110/70 पुढे आणि 140/70 मागे) मिळतात. या बाईकचा ग्राउंड क्लीयरन्स 168 mm, व्हीलबेस 1,344 mm आणि सीट उंची 807 mm आहे. यामध्ये 12 लिटरचा फ्यूल टँक असून कर्ब वेट 174 किलो आहे.
दुसरीकडे, KTM 390 Duke मध्ये 320 mm फ्रंट आणि 240 mm रिअर डिस्क ब्रेकसह मजबूत ब्रेकिंग सेटअप दिला आहे. याचा ग्राउंड क्लीयरन्स 183 mm आहे. सीट उंची 800 ते 820 mm दरम्यान अॅडजस्ट करता येते, जे वेगवेगळ्या रायडर्ससाठी सोयीचे आहे. यामध्ये 15 लिटरचा फ्यूल टँक मिळतो.
Bajaj NS400Z ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.94 लाख रुपये आहे. तर KTM 390 Duke (350cc व्हर्जन) ची किंमत सुमारे 2.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.






